खासदार शेट्टी यांच्या आज नांदेड-परभणी जिल्ह्यांत सभा
खासदार शेट्टी यांच्या आज नांदेड-परभणी जिल्ह्यांत सभा 
मुख्य बातम्या

खासदार शेट्टी यांच्या आज नांदेड-परभणी जिल्ह्यांत सभा

टीम अॅग्रोवन

अर्धापूर, जि. नांदेड : शेतकरी सन्मान अभियानांतर्गत मंगळवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता अर्धापूर (जि. नांदेड) येथे आणि मसला (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे रात्री ८ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. अर्धापूर येथील हनुमान मंदिजवळ आयोजित सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. प्रकाश पोपळे, वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर ,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले, विद्यार्थी आघाडीचे अमोल हिप्परगे उपस्थित राहणार आहेत. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीचे विनामूल्य असलेले फॉर्म भरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावेत. सभेस मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यतील मसला (ता. गंगाखेड) येथे मंगळवारी (ता. ८) रात्री आठ वाजात शेतकरी सन्मान अभियानांतर्गत खासदार राजू शेट्टी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, असे स्वाभिमानीचे मराठवाडा प्रमुख माणिक कदम, जिल्हाध्यक्ष भास्कर खटिंग, केशवर आरमळ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT