संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

बोगस कीटकनाशके विदर्भात पोचल्याचा संशय

टीम अॅग्रोवन

नागपूर  : एका कंपनीने विदर्भातील आपल्या वितरकांकडून कीटकनाशक पुन्हा मागविल्याने ते बोगस असल्याची चर्चा रंगली होती; परंतु अकोला कृषी विभागाने केलेल्या चाचणीत ते उत्पादन स्वीकृत (पास) ठरले असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कीटकनाशक माघारी बोलावण्यामागील कारणांचा शोध घेण्याचे आव्हान कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच विदर्भात लगतच्या राज्यामधून कपाशीच्या बोगस व एचटी बियाण्यांचा शिरकाव झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांपर्यंत हे बियाणे पोचविण्यात आले. त्यानंतर पोटॅश व डीएपीच्या नावाखाली बोगस खतेदेखील सर्रासपणे जिल्ह्यामध्ये दाखल झाले. ‘सेंद्रिय’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्यात आली. आता बियाणे व खतांच्या विक्रीनंतर बोगस कीटकनाशकांचीदेखील सर्रासपणे  विक्री सुरू झाली आहे.

हरियानातील गुडगाव येथील एका कंपनीच्या नावाचा वापर करून नागपुरात बनावट कीटकनाशक उपलब्ध करुन देण्यात आले. त्यानंतर अकोला येथून विदर्भातील बहुतांश जिल्हयात या कीटकनाशकांची विक्री करण्यात आली. याबाबतची तक्रार झाल्यानंतरदेखील कृषी विभागाने कानावर हात ठेवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार कृषी विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या ‘कानी` देखील आहे. मात्र, अजूनही ज्या पद्धतीने कारवाई होणे अपेक्षित त्या पद्धतीने कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता कृषी विभागाच्या गुणवत्तेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले असून, कारवाईत साटेलोटे तर नाही ना, अशी चर्चादेखील केली जात आहे.  

नागपुरातील त्या व्यावसायिकाला अभय? अकोल्यातील वितरकाने नागपुरातील ज्या व्यावसायिकाकडून हे कीटकनाशक खरेदी केले. त्या व्यवहाराच्या सर्व लेखी पुरावे व पावत्या वितरकाकडे आहेत. त्यानंतरही संबंधित व्यावसायिकाविरोधात नागपुरात कृषी विभागाच्या गुणवत्ता शाखेकडून तसेच कृषी विकास अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले कीटकनाशकाचे नमुने ‘पास’ झाले आहेत. तरीसुद्धा नागपुरातील ज्या व्यावसायिकाने अकोल्यातील वितरकाकडे हा साठा पाठविला त्याच्याकडे विक्री परवान्यात हे कीटकनाशक समाविष्ट नाही. त्यामुळे पुढील कारवाई वरिष्ठांच्या सूचनेनुसार केली जाईल, अशी माहिती अकोला येथील गुणवत्ता निरीक्षक मिलिंद जवंजाळ यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT