rahuri university
rahuri university  
मुख्य बातम्या

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांच्या निलंबनास स्थगिती 

टीम अॅग्रोवन

नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाशकुमार पाटील यांनी गेल्या आठवड्यात कुलसचिव मोहन वाघ यांना निलंबित केले होते. मात्र त्यांचे निलंबन रद्द केले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभागाचे अवर सचीव अ. नि. साखरकर यांनी याबाबत १२ मे रोजी आदेश काढले आहेत. याबाबत आता कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक याबाबत चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करणार असून त्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांना मागील आठवड्यात कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी कामात अनियमितता असल्याचे स्पष्ट करत निलंबित केले होते व वाघ यांचा पदभार डॉ. महानंद माने यांच्याकडे दिला होता. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली होती. निलंबनानंतर कुलगुरूंना अधिकार नसताना निलंबन कारवाई केल्याचा आरोप शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी करत निलंबन माघे घेतले नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. वाघ यांनीही चुकीची कारवाई झाल्याचा आरोप करत कृषी सचिवांना याबाबत पत्र लिहले होते. वाघ यांचे निलंबन रद्द केल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. बुधवारी (ता.१२) हा आदेश झाल्याचे दिसत आहे. 

काय म्हटले आहे पत्रात?  महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम १४ मधील तरतुदींनुसार वाघ यांना निलंबित करण्याला कुलगुरू हे जरी सक्षम असले, तरी वाघ हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गट-अ (वरिष्ठ) संवर्गातील अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांचे नियुक्ती प्राधिकारी कृषिमंत्री हे आहेत. त्या अनुषंगाने वाघ यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे सादर केलेला खुलासा, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार चौकशीअंती निर्णय घेणे उचित होईल. त्यानुसार कृषी शिक्षण व संशोधन महासंचालक चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करतील व त्यानंतर निर्णय होणार असून, चौकशी होईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ (५) (क) चा वापर करून कुलगुरू यांनी काढलेला निलंबनाचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT