कानगाव येथे सुरू असलेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनास शुक्रवारी (ता. २) भेट दिली. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे.
कानगाव येथे सुरू असलेल्या शेतकरी आक्रोश आंदोलनास शुक्रवारी (ता. २) भेट दिली. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे. 
मुख्य बातम्या

संपुर्ण कर्जमाफीला राष्ट्रवादीचा पाठींबा ः सुप्रिया सुळे

टीम अॅग्रोवन

वरवंड, जि. पुणे ः कर्ज भरण्याची शेतकऱ्याची मानसिकता आहे. केवळ सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शेतकऱ्यांना संप करावे लागणे म्हणजेच हा काळा दिवस म्हणावा लागेल. संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामस्थांनी २ नोव्हेंबरपासून बेमुदत शेतकरी आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी (ता. ३) आंदोलनाचा दुसरा दिवस होता. दौंड तालुक्यातील अनेक गावांनी आंदोलनास पाठिंबा देण्यास सुरवात केल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील आक्रोश आंदोलनास भेट दिली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके, लक्ष्मण सातपुते, सभापती मीना धायगुडे, नितीन दोरगे आदी उपस्थित होते. या वेळी सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना दिले. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, की सरकाचे अच्छे दिन फक्त भाजपच्या नेत्यांनाच आले आहेत. या सरकारच्या काळात एसटी, अंगणवाडी सेविका, शेतकरी आदी आंदोलने उफाळून आली. सरकारच्या सगळ्या योजना फोल ठरल्या आहेत. सरकारला शेतकरी सोडून सगळे दिसतात. तत्कालीन केद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेबांनी सर्वांत मोठी कर्जमाफी दिली. या सरकारने कर्जमाफीचे गाजर दाखविले. प्रत्यक्षात किती जणांना कर्जमाफी मिळाली हा विचार करण्याचा विषय आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT