उन्हाळी कांदा काढण्याची लगबग Summer onion About to remove
उन्हाळी कांदा काढण्याची लगबग Summer onion About to remove 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढण्याची लगबग

टीम अॅग्रोवन

पुणे : पुणे जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र काढलेला कांदा बाजारात कवडीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले असल्याचे वळती येथील शेतकरी दिलीप भोर व जारकरवाडी येथील शेतकरी राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

साधारणपणे शेतकऱ्यांनी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आपल्या शेतात कांदा लागवड केली होती. या कांद्यावर रोग पडू नये म्हणून तणनाशकांची फवारणी केली होती. साधारण कांदा पिकाला एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च झाला होता. कांद्याच्या पिकाला पाणी जास्त लागत असल्याने ओल पाहून शेतकऱ्यांनी पाणी दिले होते. साधारण तीन ते साडेतीन महिन्यांत कांदा काढणीला आला आहे.  जिल्ह्यात फुरसुंगी जातीचा कांदा मोठ्या प्रमाणात लावला जातो. मजुरांची वानवा असल्याने सावडीने किंवा रोजाने महिलेला अडीचशे ते तीनशे रुपये रोज घेऊन ही कांदा काढणी सुरू आहे.

बाजारात या काढलेल्या कांद्याला दहा किलोस १०० ते १३० रुपये  एवढा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकरी घायकुतीला आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळी करून त्यामध्ये कांदा साठवण करून ठेवण्याची लगबग सुरू आहे. उन्हाच्या तडाख्यात ही कांदा काढण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया... आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामात ४ हजार ८४५ हेक्‍टर कांदा लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीकडे कल ठेवावा. कृषी विभागाच्या कांदा चाळीच्या अनुदानाचा लाभ घ्यावा. - टी. के. चौधरी, कृषी अधिकारी, आंबेगाव

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी कांदा लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे ती रोपे वाया गेलेली त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कांदा बी विकत घ्यावे  लागले. त्यासाठी त्यांनी प्रति पायली १२ ते १३ हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे कांद्याचे उत्पादन चांगले झाले. नाहीच शिवाय बाजार भाव पडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांची तिहेरी नुकसान झाले आहे. कांद्याला डेंगळे आल्याने त्याचाही परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. - गणेश टेमकर, कांदा उत्पादक  शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT