शेतकरीप्रश्नी १९ मार्चला अन्नत्याग, एक मे रोजी राज्यव्यापी आंदोलन
शेतकरीप्रश्नी १९ मार्चला अन्नत्याग, एक मे रोजी राज्यव्यापी आंदोलन 
मुख्य बातम्या

शेतकरीप्रश्नी १९ मार्चला अन्नत्याग, १ मे रोजी राज्यव्यापी आंदोलन

टीम अॅग्रोवन

पुणे : शेतीमालाचा हमीभाव आणि शेतकरी प्रश्‍नांवरचे लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात जातीय दंगली भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आराेप करीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी विविध संघटनांनी एकत्र येत १९ मार्च राेजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदाेलन करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रदिनी (१ मे)  राज्यव्यापी आंदाेलन करण्याचा ठराव सुकाणू समितीच्या शनिवारी (ता. १०) पुण्यात झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला. सुकाणू समितीची बैठक शनिवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली. या वेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शेतककरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी नांदखिले, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग रायते, किशाेर ढमाले, प्रा. सुशीला माेराळे, प्रतिभा शिंदे, सचिन धाेंडे, सुभाष काकुले, गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित हाेते.  या वेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘शेतकरीप्रश्‍नी लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी या षडयंत्राला बळी न पडता, आपली एकी कायम ठेवणे गरजेचे आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांबाबत सर्व शेतकरी संघटना आणि समविचारी संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी १५ फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्याचा दाैरा करण्यात येणार आहे. या दाैऱ्यानंतर १९ मार्च राेजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदाेलन करण्यात येणार आहे. यानंतर २३ मार्च राेजी हुतात्मा अभिवादन सभा प्रत्येक जिल्‍ह्याच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. यामध्ये शहीद शेतकरी साहेबराव करपे यांचे छायाचित्र आणि त्यांच्या आत्महत्या करताना लिहिलेल्या पत्राचे फलक लावण्यात येणार आहे. यानंतर १ मे राेजी महाराष्ट्रदिनी राज्यव्यापी आंदाेलन करण्यात येणार असून, त्याची घाेषणा २३ मार्च राेजी करण्यात येणार आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT