Sugarcane workers stranded in Solapur will go to their native village
Sugarcane workers stranded in Solapur will go to their native village 
मुख्य बातम्या

सोलापुरात अडकलेले ऊसतोड कामगार जाणार मूळगावी 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यावर अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याची प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहेत. सुमारे २५०० एवढे कामगार जिल्ह्यात अडकले असून, त्यात सर्वाधिक १४७६ कामगार माळशिरस तालुक्यात आहेत. 

जिल्ह्यात सर्वाधिक ३३ साखर कारखाने आहेत. त्यापैकी यंदा ८ ते १० कारखानेच सुरू राहिले. पण कोरोनामुळे जाहीर झालेल्या लाॅकडाऊनमुळे कारखान्याच्या कामामध्ये अडथळे आलेच. पण ऊसतोडही थांबली. परिणामी, राज्याच्या विविध भागातून आलेले ऊसतोड कामगारही अडकले. राज्य शासनाने नुकताच यासंबंधी आदेश काढून या कामगारांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. 

त्यानुसार प्रशासन व्यवस्था करीत आहे. सुमारे २५०० कामगार जिल्ह्यात अडकले आहेत. त्यात मंगळवेढा तालुक्यात ४८, सांगोला १९९, माळशिरस १४७६, करमाळा ३६७, माढा २५०, पंढरपूर १६४ ऊसतोड कामगार आहेत. याशिवाय इतर राज्यातील स्थलांतरित मजूरही सोलापुरात अडकले आहेत, त्यांचा निर्णय शासन व प्रशासनस्तरावर कधी घेणार हा प्रश्न प्रलंबितच आहे. सध्या त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांशी प्रशासनाचे बोलणे सुरू आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची गावनिहाय यादी सादर केली जात आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळताच या सर्व मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

कामगारांची व्यवस्था चोख  जिल्ह्यात अडकलेल्या ऊसतोड कामगारामध्ये बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, नगर, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यातील कामगारांचा समावेश आहे. त्या-त्या कारखान्यावर तसेच अन्य ठिकाणी या सर्व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना तशी अडचण नाही, पण मूळगावी पाठवण्याची त्यांची मागणी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT