ऊस तोडणी
ऊस तोडणी  
मुख्य बातम्या

ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारण

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या उसाची बिले गेल्या दीड महिन्यापासून जमा झाली नसल्याने याचा विपरीत परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या अर्थकारणावर झाला आहे. शेतकऱ्याच्या हातात रक्कम नसल्याने शेतकामे करणे अडचणीचे ठरत आहे. मशागतीसाठी भाडे देण्यासही रक्कम नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण होत आहे. येत्या काही दिवसांत जर उसाची रक्कम नाही झाली, तर ऊस पट्ट्यातील परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर कारखाने सुरू झाले. परंतु साखरेबाबत विपरीत परिस्थिती असल्याचे सांगत एकाही कारखान्याने एक रुपयाही बिल कारखान्यांनी जमा केले नाही. ऊस गेल्यानंतर तातडीने मशागती करून इतर पिके किंवा नव्या लावणी करण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल असतो. रब्बी, किंवा उन्हाळी पिके घेण्यासाठी शेतकरी धडपडत असतो.  मशागती पूर्ण होईपर्यंत पंधरा दिवसांच्या कालावधीत बिले जमा होतात. यानंतर शेतकरी मशागत केलेल्या ट्रॅक्टरधारकांना रक्कम देतात, पण बिले जमा नसल्याने हे चक्रच थांबले आहे. यामुळे शेतकामे करूनही ट्रॅक्टरधारकांची उधारी कायम आहे. उत्पादकांकडे पैसे नसल्याने उत्पादकांना आम्ही भाड्याचे पैसे मागू शकत नसल्याचे ट्रॅक्टरधारकांनी सांगितले. लग्नसराईवरही परिणाम उत्पादकांच्या हातात पैसे नसल्याने याचा परिणाम लग्नसराईवर होत असल्याचे चित्र आहे. हाती पैसे नसल्याने उत्पादकांनी लग्नासारखी कार्ये पुढे ढकलली आहेत. अनेक जण कर्ज काढून रक्कम उभा करत असल्याचे चित्र ऊस पट्ट्यात आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठही थंडच असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. उत्पादकातून संतप्त प्रतिक्रिया सध्या २५ टक्क्यांहून अधिक ऊसतोडणी आटोपली आहे. पण हातात रक्कम नाही. सरकार व कारखान्याच्या खेळात आमचे प्रचंड नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांतून निर्माण होत आहे. बिले नसल्याने ऊस उत्पादक पुरता हतबल झाला आहे.  प्रतिक्रिया गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच अशी वेळ आमच्यावर आली आहे. माझा ऊस जाऊन महिना झाला तरी बिल मिळाले नाही. अगोदर उत्पादन कमी आले आहे. त्यातच बिले जमा नसल्याने दुहेरी चक्रात आम्ही अडकलो आहोत - सुरेश पाटील, ऊस उत्पादक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT