पाणीटंचाईमुळे ऊस लागवड ठप्प
पाणीटंचाईमुळे ऊस लागवड ठप्प 
मुख्य बातम्या

पुणे विभागात पाणीटंचाईमुळे ऊस लागवड ठप्प

टीम अॅग्रोवन

पुणे ः आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. सध्या पुणे विभागात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी ऊस लागवडी ठप्प झाल्या आहेत. विभागात अवघ्या एक लाख एक हजार ९७० हेक्टरवर ऊस लागवडी झाल्या असल्याचे चित्र आहे.

यंदा जून महिन्यापासून पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. विभागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि संगमनेर, अकोले या तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली होती. परंतु परतीच्या पुरेसा पाऊस न झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही.

परिणामी आॅक्टोबरपासून पुणे विभागातील बहुतांशी तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आगामी काळात पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्तापासूनच सावध भूमिका घेत पुढील काळातील पाणीटंचाई गृहीत धरून शेतकऱ्यांनी ऊस लागवडी करण्याचे सोडून दिले आहे. त्याचा साखर कारखान्यांच्या पुढील हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुणे विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर ही जिल्हे उसाचे आगार म्हणून राज्यात ओळखली जातात. विभागात उसाचे सरासरी चार लाख १३ हजार ५८० हेक्टर क्षेत्र असून शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू अशा प्रकारच्या उसाची टप्प्याटप्प्याने लागवड करतात. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासून कमी पाऊस झाला. त्यामुळे आडसाली उसाच्या अवघ्या ८८ हजार ७१० हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत.

यामध्ये नगर जिल्ह्यात अवघे ३३ हजार २००, पुणे जिल्ह्यात ३३ हजार ५२० आणि सोलापूर जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवर आडसाली उसाची लागवड झाली आहे. पूर्व हंगामी ऊसाची १३ हजार २६० हेक्टरवर लागवड झाली आहे. यामध्ये नगर जिल्ह्यात सहा हजार २६०, पुणे जिल्ह्यात ७६०, सोलापूरमध्ये ६ हजार २४० हेक्टरवर लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT