For Sugarcane, electricity, insurance Ambajogai Morcha 
मुख्य बातम्या

ऊस, वीज, विमाप्रश्नी अंबाजोगाईत मोर्चा

अंबाजोगाई, जि. बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा, वीज व अतिरिक्त उसाचा प्रश्नावर आक्रमक शेतकऱ्यांनी अंबाजोगाई तहसील कार्यालयावर मंगळवारी (ता.८) मोर्चा काढला.

टीम अॅग्रोवन

अंबाजोगाई, जि. बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा, वीज व अतिरिक्त उसाचा प्रश्नावर आक्रमक शेतकऱ्यांनी अंबाजोगाई तहसील कार्यालयावर मंगळवारी (ता.८) मोर्चा काढला. या आधी अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ७) परळी तहसील कार्यालयावर धडक दिली होती.

परळीपासून पुणे-मुंबईपर्यंत वारंवार दाद मागूनही प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आता आणखी विलंब करून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तत्परतेने मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी अंबाजोगाई तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली. 

या मोर्चात कॉ. अजय बुरांडे, कॉ. उत्रेश्वर इंगोले, कॉ. दिनेश शेप, कॉ. रवींद्र देवरवाडे, कॉ. जगन्नाथ धाळे, कॉ. दत्तात्रेय नेवल, कॉ. विष्णू जाधव, कॉ. राहुल हाके, कॉ. गणपत गायके आदी सहभागी झाले.

..या आहेत मागण्या

२०२० च्या खरीप व रब्बी पिकांचा पीकविमा जमा करा, २०२१ चा पीकविमा नुकसानीच्या प्रमाणात सरसकट सर्व शेतकऱ्यांना तातडीने जमा करा. २०१८ च्या पीकविम्यापासून वंचित सर्व शेतकऱ्यांना विमा वितरित करा, उसाचे पंचनामे करून ऊस कार्यक्षेत्राबाहेर नेऊन गाळप करावा. वेळेत एफआरपीनुसार रक्कम आदा करावी. १५ महिन्यांपुढील उसाला नुकसान भरपाई द्यावी, विद्युतपुरवठा सुरळीत करावा.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Shetkari 8th Installment : नमोचा आठवा हप्ता पुढच्या आठवड्या जमा होणार; दोन हजार रूपये बँक खात्यावर येणार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर; राज्यातील ८३ टक्के विवाहित, १.८ टक्के अविवाहित, तर ४.७ टक्के विधवा महिलांना मिळतोय लाभ

Bamboo Plantation: बांबू विकास प्रकल्पांतर्गत सहा लाख रोपांची लातूर जिल्ह्यात लागवड

Villagers Protest: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांविरोधात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

MAGNET Project: ‘मॅग्नेट’च्या अभ्यासदौऱ्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT