संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस गाळप

टीम अॅग्रोवन

सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू असून गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वच कारखाने प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ४६ लाख ३५ हजार ६६१ टन उसाचे गाळप केले आहे. याद्वारे ५२ लाख ८४ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी उताऱ्यात सुधारणा झाल्याने साखर उत्पादनात वाढ झाली आहे. 

जिल्ह्यातील ऊस हंगाम मध्यावर आला असून गाळपास गती आली आहे. जिल्ह्यातील नऊ सहकारी व पाच खासगी साखर कारखान्यांनी ४६ लाख ३५ हजार ६६१ टन उसाचे गाळप केले आहे. याद्वारे ५२ लाख ८४ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. नऊ सहकारी कारखान्यांनी २५ लाख ८९ हजार ९९८ टन उसाचे गाळप केले असून याद्वारे २९ लाख ७१ हजार १९० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. खासगी पाच कारखान्यांनी २० लाख ४५ हजार ६६२ टन उस गाळप केले आहे. याद्वारे २३ लाख १३ हजार ७१० क्विंटल साखर उत्पादित केली आहेत.

सह्याद्री कारखान्याची गाळप क्षमता मोठी असल्याने या कारखान्याने सर्वाधिक सहा लाख ६७ हजार ४०० टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे आठ लाख ०६ हजार ४९५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. साखर उताऱ्यात जयवंत शुगर या खासगी कारखान्याची आघाडी असून या कारखान्याचा सरासरी साखर उतारा १२.३९ टक्के आहे. खंडाळा तालुका कारखान्याचा साखर उतारा सर्वात कमी ९.१५ टक्के आहे. सर्वच कारखान्यांकडे उस तोडणी मजूर यंत्रणा मुबलक असून ऊस तोडणी मशिनच्या संख्येत वाढ केली असल्याने कारखान्यांचे गाळप वेगात सुरू आहे.   एकरकमी एफआरपीकडे दुर्लक्ष ऊस गाळप हंगाम मध्यावर आला असतानाही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच कारखान्यांनी पहिली उचल दिली आहे. ही उचल देताना एकरकमी एफआरपीऐवजी ८०-२० सूत्र स्वीकारले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकरकमी एफआरपीकडे कारखान्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. एफआरपीचे तुकडे केले जात असल्याने कर्ज नवेजुने करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT