Sugar production in Sangli district likely to reach low
Sugar production in Sangli district likely to reach low 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात साखर उत्पादन नीचांक गाठण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अडीच महिन्यांत ४१ लाख १९ हजार टन उसाचे गाळप केले. ४९ लाख २ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर, सरासरी साखर उतारा ११.९ टक्के इतका मिळाला. कारखान्यांचा हंगाम मार्च अखेरपर्यंत राहील, असे चित्र आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे साखर उत्पादनाचा नीचांक गाठला जाईल, अशी शक्यता आहे. 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिने उलटले. आत्तापर्यंत सहकारी नऊ आणि खासगी तीन अशा १२ कारखान्यांनी ४१ लाख १९ हजार टन उसाचे गाळप केले आहे. तर, ४९ लाख २ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. आणखी महिनाभर गळीत हंगाम सुरू राहील, असे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला. ३० टक्के ऊस उत्पादन घटले आहे. अवकाळी पावसामुळे यंदा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. त्यामुळे यंदा जेमतेम तीन ते साडेतीन महिने हंगाम सुरू राहील, असा अंदाज वर्तवला गेला. ऊस क्षेत्र कमी असल्यामुळे अधिकाधिक गाळप करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात कारखान्यांची स्पर्धा रंगेल, असे चित्र आहे. 

गाळप आणि साखर उत्पादन

साखर कारखाने ऊस गाळप (मे.टन) साखर उत्पादन (क्विंटल) साखर उतारा
वसंतदादा-दत्त इंडिया  ४८५२५०  ५४०५३० ११.१४
राजारामबापू साखराळे  ४९६६८०  ६२३८०० १२.५६
विश्‍वास सहकारी  ३४७५४०  ४०६२४०   ११.६९
हुतात्मा किसन अहीर ३१२३९५ ३७८०५० १२.१०
राजारामबापू वाटेगाव २९७०२०  ३६३८०० १२.२५
सोनहिरा सहकारी    ४८५६०५  ५९६६६०   १२.२९
क्रांती सहकारी ४६७६५० ५६३६३०  १२.०५
सर्वोदय-राजारामबापू  २१४५८५ २६४३१०  १२.३२
मोहनराव शिंदे  १९११००  २०८३०० १०.९०
निनाईदेवी-डालमिया  १९६९९६   २४९१०० १२.६४
उदगिरी शुगर ३१७५००  ३८२२५०  १२.०४
सद्‌गुरू श्री श्री ३०७६३८   ३२५३३०  १०.५८
एकूण ४११९९५९   ४९०२०००   ११.९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT