ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम  
मुख्य बातम्या

राज्यात आतापर्यंत उसाचे १२५ लाख टन गाळप

टीम अॅग्रोवन

पुणे : ऊसदरासाठी राज्याच्या काही भागांत आंदोलने सुरू असताना, गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळपाचा वेग मात्र चांगला असून, आतापर्यंत १२५ लाख टन गाळप झाले आहे.  राज्यात १९३ साखर कारखान्यांनी यंदा गाळप चालू केले आहे. मात्र, गाळप परवाना आतापर्यंत फक्त १७० कारखान्यांना मिळालेला आहे. यातील १६० साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, त्यात ८९ सहकारी आणि ७१ खासगी कारखान्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  उसाची उपलब्धता गेल्या वर्षी केवळ ६.३३ लाख हेक्टरवर होती. यंदा तीन   लाख हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली असून, यंदाची एकूण उपलब्धता ९.०२ लाख हेक्टरवर राहील, असा अंदाज आहे. गुऱ्हाळे तसेच परराज्यांत भरपूर ऊस जात असल्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना उपलब्ध उसातून गाळपासाठी अंदाजे ६५० लाख टन ऊस मिळेल, असा प्राथमिक अंदाज आहे.   ‘‘ऊस भरपूर उपलब्ध असला तरी गाळप क्षमतेबाबत तांत्रिक अडचण नाही. कारण, सुरू झालेल्या कारखान्यांची सध्याची एकूण प्रति दिन गाळप क्षमता ५ लाख ४० हजार टन इतकी आहे. त्या तुलनेत गाळपाला कमी ऊस येत असल्याने आतापर्यंत १२५ लाख टन गाळप झाले आहे. अर्थात, आंदोलनाची धग कमी झाल्यास उसाचा पुरवठा वाढून गाळपाला वेग मिळेल,’’ अशी अपेक्षा साखर उद्योगातून व्यक्त केली जात आहे.  राज्यातील विभागनिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन स्थिती  (ऊस गाळप ः लाख टनांत) (उत्पादन ः लाख क्विंटल)

विभाग     कारखाने     गाळप     उत्पादन     उतारा (टक्के)
कोल्हापूर    ३५     २९.२६     २९.३४     १०.०३
पुणे     ५७     ४७.५५     ४४.०४     ९.२६
अहमदनगर  २१     १९.७२     १७.१४     ८.६९
औरंगाबाद   १८     ११.४     ८.२८     ७.२४
नांदेड     २६     १६.३७     १३.३७     ८.१६
अमरावती    २     १.१५     १.००     ८.७०
नागपूर     १     ०.१२     ०.०८     ६.०६
एकूण     १६०     १२५     ११३     ९.०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT