Sugar factories in Solapur district will be provide sanitizer  across the country
Sugar factories in Solapur district will be provide sanitizer across the country 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे सॅनिटायझर जाणार देशभर

टीम अॅग्रोवन

सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या स्वच्छतेला अधिक महत्व आले आहे. परिणामी, सॅनिटायझरची मागणी सर्वाधिक वाढली आहे. पण, एकाचवेळी मागणी वाढल्याने मागणी आणि पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या आवाहनानुसार सोलापुरातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेत सॅनिटायझरचे उत्पादन सुरु केले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक १० साखर कारखान्यांनी सॅनिटायझरच्या प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली आहे. सध्या प्रतिदिन तीन लाख लिटरचे उत्पादन सुरु आहे. येत्या पंधरवड्यात या सॅनिटायझरचा राज्यासह देशाच्या मार्केटमध्ये पुरवठा होणार आहे. 

‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत. पण, त्यावर काहीच पर्याय नाही. वैयक्तिक स्वच्छता पाळणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हेच प्राथमिक उपाय सध्या तरी आहेत. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. शासनाने इथेनॅाल प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीसाठी आवाहन केले होते. 

जिल्ह्यातील इथेनॅाल प्रकल्प असणाऱ्या आणि बॅाटलिंग करण्याची सोय असणाऱ्या कारखान्यांना त्यासाठी प्राधान्याने परवाने दिले आहेत. त्यानुसार दहा साखर कारखान्यांनी तयारी दाखवत, प्रत्यक्ष उत्पदनासही सुरुवात केली आहे. त्यात माळशिरस तालुक्यातील ब्रिमासागर, पांडुरंग साखर कारखाना, श्रीपूर, लोकमंगल शुगर- बीबीदारफळ, जकराया शुगर- वटवटे, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना- पिंपळनेर, श्री विठ्ठल शुगर- म्हैसगाव, फॅबटेक शुगर-मंगळवेढा, युटोपियन शुगर-मंगळवेढा आणि टेंभुर्णीतील खंडोबा डिस्टिलरी आणि सोलापुरातील लक्ष्मी डिस्टिलरी प्रकल्प या कारखान्यांचा समावेश आहे.  पंधरवड्यात मार्केटमध्ये येणार 

येत्या ३० जूनपर्यंत या कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. या सर्व व्यवस्थेवर शासनाच्या औषध प्रशासनाचे नियंत्रण आहे. बंगळूर, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये औषधे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांद्वारे त्याचे वितरण होईल. ‘लॅाकडाऊन’चा कालावाधी पूर्ण होण्याआधी अधिकाधिक सॅनिटायझर उत्पादन पूर्ण करण्याची सूचना कारखान्यांना केली आहे. त्यानुसार उत्पादन वेगाने सुरु आहे. ५० मिली, १००, ५०० ते १००० मिलि या प्रमाणात त्याचे बॅाटलिंग होते आहे. पुढच्या पंधरवड्यापर्यंत हे सॅनिटायझर ग्राहकांना उपलब्ध होईल, असे नियोजन आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT