साखर कारखान्यांनी पहिला हप्ता घटविला
साखर कारखान्यांनी पहिला हप्ता घटविला 
मुख्य बातम्या

साखर कारखान्यांनी पहिला हप्ता घटविला

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : साखरेच्या घसरत्या किमतीचा फटका अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील ऊस उत्पादकालाच बसला आहे. साखरेच्या दरात कमालीची घसरण झाल्याने जिल्ह्यातील कारखान्यांनी येथून पुढे तोडणी होणाऱ्या उसास पहिला हप्ता प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे देण्याचा निर्णय बुधवारी (ता. ३१) येथे झालेल्या बैठकीत घेतला. हंगामाच्या प्रारंभी एफआरपी अधिक दोनशे रुपये असा पहिला हप्ता कारखान्यांनी जाहीर केला होता. जिल्ह्यातील रिकव्हरीनुसार व कारखान्यांचा वाढीव दर या सूत्रानुसार ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत जात होती. 

परंतु बुधवारी कारखान्यांनी सरसकट पहिला हप्ता २५०० रुपये जाहीर केल्याने आता पहिल्या हप्त्यातच टनामागे पाचशे रुपये कमी मिळणार आहेत. जाहीर केलेली उर्वरित रक्कम नक्की देऊ; पण त्यासाठी जादाची रक्कम उपलब्ध व्हावी लागेल, त्यानंतर ती देण्यात येणार असल्याचे कारखानदारांनी सांगितले. 

कारखानदार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या वेळी साखर हंगाम सुरू झाला, त्या वेळी साखरेचे दर ३६०० रुपये इतके होते. गळीत हंगाम सुरू झाला त्या वेळी ठरल्याप्रमाणे बिले अदा केली आहेत. हंगाम सुरू झाल्यानंतर अचानकपणे तीन महिन्यांत साखरेचे दर २६०० रुपयांवरून २८०० रुपयांपर्यंत घसरले. यातच साखरेचा उठाव नाही व राज्य बॅंकेनेही मूल्यांकनात घट केली आहे. बॅंकेकडून निर्माण होणारी रक्कम पाहता ती पहिल्या हप्त्यासाठी अपुरी ठरते. बॅंकेतून मिळणाऱ्या रकमेतून मागच्या कर्जाचे हप्ते, व्याज, साखर तयार करण्यासाठी येणारा प्रक्रिया खर्च, असा खर्च वजा जाता टनास १७७५ रुपयेच उपलब्ध होत आहेत. 

जिल्ह्याचा सरासरी उतारा १२.५० टक्के इतका आहे. यातून मोलॅसिस, बगॅस, प्रेसमड इत्यादीचे उत्पादनातून २७६४ रुपये उपलब्ध होत आहे. ६०० रुपये तोडणी खर्च वजा जाता प्रतिटन २१६४ रुपये कारखान्यांकडे उपलब्ध होतात. कारखान्यांनी जाहीर केलेले दर व प्रत्यक्ष उपलब्ध होणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. बॅंकाही रक्कम देण्यास तयार नाही. यामुळे कारखानदारांनी २५०० रुपयेप्रमाणे दर देण्याचा निर्णय घेतला आहे. जाहीर केलेली रक्कम कारखानदार नक्की देतील; परंतु पैशाची उपलब्धता झाल्यानंतर देण्याचा निर्णय कारखानदारांनी या बैठकीत घेतल्याचे कारखानादार सूत्रांनी सांगितले.  एफआरपीपेक्षाही कमी हप्ता? जिल्ह्यातील कारखान्यांची सरासरी रिकव्हरी साडेबारा टक्के इतकी आहे. या रिकव्हरीनुसार एफआरपीचा पहिला हप्ता २७०० रुपयांपर्यंत होतो. यामुळे सध्या तरी पहिला हप्ता एफआरपीपेक्षा कमीच मिळण्याची शक्‍यता असल्याच्या साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. साखरेचे दर वाढल्याशिवाय पुढील रक्कम लवकर मिळण्याची शक्‍यता धूसर असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितल्याने आता पुन्हा एकदा पहिल्या हप्त्याचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT