साखर कारखाना
साखर कारखाना  
मुख्य बातम्या

साखर कारखान्यांपुढे प्रक्रिया खर्चवाढीचे आव्हान

Raj Chougule

कोल्हापूर : दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराचे फटके दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहेत. उसाच्या आवकेत घटीची शक्‍यता व्यक्त होत असली तरी आता साखर करण्यासाठीच्या प्रक्रिया खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने साखर कारखानदारांचे यंदाचे गणित चुकणार आहे. रिकव्हरी लॉसमुळे साखरेचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे तीस ते चाळीस टक्के ऊस पुरामुळे पूर्ण खराब झाला. अनेक ठिकाणी केवळ नावालाच ऊस उभा आहे. यातून एकरी दहा पंधरा टनही उत्पन्न निघेल याची साशंकता आहे. निकृष्ट दर्जाचा ऊस कारखान्यांना गाळपासाठी नेणे अपरिहार्य आहे. याचा फटका मात्र कारखानदारांना बसणार आहे.  एका टनापासून साधारणत: किती ऊस निघेल, एकूण किती गाळप होईल त्यानुसार साखरेचे किती उत्पादन होईल याचा ठोकताळा प्रत्येक कारखाना हंगाम सुरू होण्याअगोदर बांधू शकतो. यंदा अनेक ठिकाणी शेतात ऊस उभा असला तरी तो किती निघेल याचा अंदाज कारखाने बांधू शकत नसल्याची स्थिती सध्या आहे. यामुळे प्रत्येक कारखाना क्षमतेच्या कमी प्रमाणातच गाळप करेल, अशी शक्‍यता आहे. दुसरीकडे कमी रिकव्हरीमुळे साखरेचे उत्पादन कमी होणार आहे.  ऊस गाळपास आल्यानंतर तो तातडीने गाळला जातो, त्याचे गुणधर्म बदलण्याअगोदर त्याची साखर करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. सध्या शेतात ऊस उभा असला तरी तो कुजला आहे. यामुळे तयार होणारा रस हा निकृष्ट होण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर उसाचा पीएच, ब्रिक्‍स, शुद्धता, फायबर चुन्याची टक्केवारी आदी घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी-जास्तपणा होऊ शकतो. हे सर्व घटक चांगल्या पातळीत आणण्यासाठी जादा प्रमाणात प्रक्रिया करावी लागणार असल्याने तो खर्च प्रत्येक वर्षाच्या हंगामापेक्षा वाढणार आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT