साखर आयुक्त-शेतकरी संघटना आंदोलकांत चर्चा
साखर आयुक्त-शेतकरी संघटना आंदोलकांत चर्चा 
मुख्य बातम्या

साखर आयुक्त-शेतकरी संघटना आंदोलकांत चर्चा

कोजेन्सिस वृत्तसेवा

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत आणि एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी सुरु असलेल्या शेतकरी संघटनेच्या बेमुदत आंदोलनस्थळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज (ता.२६) भेट दिली. संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांच्याबरोबर चर्चा केली.

आंदोलनकांनी ध्वजवंदन न करु देण्याच्या इशाऱ्याच्या पाश्वर्भूमीवर पोलिसांनी शेतक-यांना साखर आयुक्त कार्यालयातील झेंडावंदनास प्रतिबंध केला. मात्र, ध्वजवंदनास आलेल्या साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सकाळी ९ वाजता यांनी शेतकरी संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्याशी रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी चर्चा केली.

यावेळी दोन साखर कारखान्यामधिल अंतराची अट रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारला सादर करण्याचे आश्वासन साखर आयुक्तांनी दिले.  मागिल आणि चालू हंगामाची FRP एकरकमी घेतल्याशिवाय बेमुदत धरणे आंदोलन परत घेणार नाही, असे रघुनाथदादा आणि आपेट यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT