medicinal crop
medicinal crop  
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडले

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान पुन्हा रखडविण्यात आले आहे. यापूर्वी केंद्राने पाठविलेला २६५ लाखांचा निधी हरविल्याचे प्रकरण गाजले होते.  राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटक योजनेतून शेतकऱ्यांना ६० प्रकारच्या औषधी वनस्पतींसाठी अनुदान मिळू शकते. ३० ते ७० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची जबाबदारी कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन मंडळाकडे देण्यात आली आहे. मात्र, ही योजना गावपातळीवर पोहोचलेली नाही. विदर्भात अमरावती, अकोला, बुलडाणा भागात ४०० ते ५०० हेक्टरवर वनौषधीची शेती बहरते आहे. अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याने कृषी विभागाकडे खेटे न मारता परस्पर वनौषधीचे उत्पादन घेतात.   अनुदान वाटपातील मोठा गोंधळ २०१७-१८ मध्ये उघड झाला होता. २६५ लाख रुपये अनुदान असतानाही शेतकऱ्यांना न वाटता दाबून ठेवले होते. हा निधी सापडत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार गेली होती. निगरगट्ट अधिकाऱ्यांनी या तक्रारीनंतर देखील तब्बल तीन वर्षांनी अनुदान वाटले.   नागार्जुन औषधी वनस्पती शेतकरी उत्पादक कंपनीच्या म्हणण्यानुसार, योजनेचा गोंधळ २०१८-१९ मध्ये देखील सुरूच ठेवला गेला. शेतकऱ्यांकडून कागदपत्रे मागवून घेण्यात आली. मात्र, अनुदान दिलेले नाही. आता शेतकऱ्यांना पुन्हा २०१९-२० ची कागदपत्रे आणण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.  फलोत्पादन मंडळात यापूर्वी महावीर जंगटे, त्यानंतर डॉ. मेघना केळकर यांनी योजनेचा चांगला प्रचारप्रसार केला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत टोलवाटोलवीची भूमिका शेतकरी अनुभवत आहेत. ‘हॉर्टनेट’ संकेतस्थळावर  ‘अनुदान मापदंडानुसार मिळते’ अशी मोघम माहिती देण्यात आली आहे.  ‘नागार्जुन’चे अध्यक्ष कमलकांत लाडोळे म्हणाले की, ‘‘अधिकाऱ्यांच्या खोडसाळपणामुळे वनौषधीची शेती विकसित झालेली नाही. शेतकऱ्यांनी पिंपळी, मुसळी उत्पादनासाठी अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, ते मिळणार नाही अशीच भूमिका घेतली जाते. पारदर्शकपणे कामे केल्यास वनौषधी उत्पादक शेतकरी वाढू शकतात. मात्र, फलोत्पादन मंडळ पांढरा हत्ती बनला आहे. तो पोसण्यापेक्षा त्रयस्त संस्थेला ही कामे देणे योग्य ठरेल.’’

प्रतिक्रिया राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. आमच्याकडे काहीही प्रलंबित नाही. प्रलंबित असल्याचे आढळल्यास आयुष मंत्रालयाकडे पाठपुरावा करून अनुदान मिळवून दिले जाईल. - डॉ. अ.रा. हसनाबादे,  प्रकल्प संचालक, फलोत्पादन मंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT