Submit the proposal of Government Medical College: Bhujbal
Submit the proposal of Government Medical College: Bhujbal 
मुख्य बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करा ः भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘नाशिक येथे नवीन वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करा,’’ असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत नाशिक येथे नवीन वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत बैठक घेण्यात आली. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दीपक म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘उत्तर महाराष्ट्राच्या जनतेची ही गेली अनेक वर्षांपासूनची मागणी होती. हे महाविद्यालय नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारातच होणार आहे. त्यासाठी नाशिकमधील जिल्हा सामान्य रुग्णालय व विभागीय संदर्भीय सेवा रुग्णालय संलग्नित करणे आवश्यक आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय करार करण्यात येईल. याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा. शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू केले जातील. या महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रशासकीय बाबी तत्काळ पूर्ण कराव्या.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT