सन्मान योजनेचा निधी जमा करा : शेतकऱ्यांची मागणी
सन्मान योजनेचा निधी जमा करा : शेतकऱ्यांची मागणी 
मुख्य बातम्या

सन्मान योजनेचा निधी जमा करा : शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन

उमदी, जि. सांगली : सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट जाहीर केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी परिसरातील कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झालेला नाही. याबाबत टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी तसा इशारा प्रशासनाला दिला.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तलाठ्यांकडे आधार कार्ड व बॅंक पासबुकची झेरॉक्‍स प्रत जमा करावी, असे आवाहन तहसीलदारांनी केले. शेतकऱ्यांनी आशेने कागदपत्रे तलाठ्यांकडे देऊनही रक्कम जमा झाली नाही. कागदपत्रे जमा करून आठ महिने झाले. तरीही परिसरातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत पैसे जमा होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. निधीची रक्कम खात्यात जमा करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 

जत तालुका कायम दुष्काळी आहे. खरीप वाया गेला. रब्बीही हातचा गेला. अवेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपही संपला. द्राक्षासह डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारच्या मदतीची खरी गरज आहे. सरकारच्या वतीने मिळणारा सन्मान निधी मोजक्‍या राष्ट्रीयीकृत बॅंक खाते असलेल्या शेतकऱ्यांना मिळाला. इतर बॅंकांत खाते असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप तो मिळाला नाही. या योजनेसाठी कृषी महसूल आणि पंचायत समिती या त्रिसदस्यीय समितीतर्फे शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टल वर अपलोड करण्यात आली.  मध्यंतरी निवडणुकांमुळे योजनेचे काम बंद झाले.

निवडणुकीनंतरही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर बॅंकेत रक्कम जमा न झाल्याने चौकशी करणाऱ्यांना महसूल विभागाकडून निवडणुकीनंतरही टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. महसूलकडून पोर्टलवर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात येते. मग निधी जमा करण्यात अडचण काय, असा सवाल आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT