वीजनिर्मितीचे दर कमी करण्यासाठी अभ्यास सुरू : ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे
वीजनिर्मितीचे दर कमी करण्यासाठी अभ्यास सुरू : ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे  
मुख्य बातम्या

वीजनिर्मितीचे दर कमी करण्यासाठी अभ्यास सुरू : ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे

टीम अॅग्रोवन

नाशिक : वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा खर्च हा ८० टक्क्यांपर्यंत आहे. त्यासाठी त्याची उपलब्धता होण्यासाठीचा विषय केंद्राच्या अखत्यारीत येतो. या अनुषंगाने वीजनिर्मिती करण्यासह त्याचे दर कसे कमी करता येतील याबाबत अभ्यास सुरू असून, तोडगा काढण्यात येईल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकलहरे औष्णिक वीज केंद्रास त्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते. या वेळी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे याही उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी कोळसा हाताळणी विभाग टिपलर २ व ३ येथे पाहणी केली. कोळशाची उपलब्धता, साठवणूक, गुणवत्ता या केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच सर्व संचलनाविषयी अनेक तांत्रिक बाबी जाणून घेतल्या व आढावा घेतला. पाहणीनंतर सर्व औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी विद्युत केंद्राच्या कामगिरीबद्दल सादरीकरण दिले. प्लांट परफॉर्मन्सवर चर्चा झाली. कोळशाची गुणवत्ता, संचाची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता यावर चर्चा झाली.  साहाय्यकारी ऊर्जा खपत कमी करण्याविषयी त्यांनी निर्देश दिले. तर पाण्याच्या गुणवत्तेविषयी पुढील पातळीवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोरबरच सी.एस.आर.मध्ये झालेल्या आणि प्रस्तावित कामाचा आढावा घेतला. या वेळी वीज केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, प्रभारी उपमुख्य अभि.(प्रशासन) आर. सी. कमटमकर, अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, शशांक चव्हाण, प्रवीण गोसावी यांसह विविध विभागांचे अधिकारी व कार्यकारी अभियंता विभाग प्रमुख उपस्थित होते. 

६६० मेगावॉट प्रकल्प सुरू करण्याची मागणी विद्युत केंद्रातील विविध संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ६६० मेगावॉटच्या नवीन बदली संचाच्या मागणीसाठीचे निवेदन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे दिले. या वेळी ६६० मेगावॉट प्रकल्प संचाबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन त्यांनी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT