students
students 
मुख्य बातम्या

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळणार शिक्षण 

टीम अॅग्रोवन

पुणे : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया घरी सुरू राहावी, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने गृह अध्ययन आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षकांमार्फत घर बसल्या शिक्षण मिळणार आहे, सोशल मेडियाच्या माध्यमातून वर्ग शिक्षकांमार्फत या उपक्रमाचे सनियंत्रण केले जाणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शाळा बंद आहेत, तसेच परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात येऊन शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत विद्यार्थी घरीच राहणार आहेत. या काळात त्यांची अध्ययन प्रक्रीया सुरू राहण्याच्या दुष्टीने जिल्हा परिषदेने गृह अध्ययन प्रकल्पाअंतर्गत आराखडा तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी २०१९-२० वर्षातील अभ्यासक्रमाचा सराव पुर्ण केल्यानंतर पुढील वर्षामध्ये येणाऱ्या विषयांची पुर्वतयारी होईल, अशा अभ्यासक्रमाचा यात समावेश करण्यात आला आहे. शाळेतील सर्व शिक्षणकांमार्फत त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत सोशल डिजिटल माध्यमांद्वारे हा कार्यक्रम पाठवून त्याद्वारे सनियंत्रण केले जाणार आहे. 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर अध्ययन आराखडा हा सुट्टीतील अभ्यास आहे, यात दोन्ही सत्रातील पाठ्यक्रमाचा समावेश केला आहे. हा अभ्यास कौशल्यावर आधारित आहे. यातील कौशल्याचा एक घटक दररोज अभ्यासाला घेतला जाणार आहे. सर्व अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातील असल्याने पुस्तके संदर्भ म्हणून वापरता येतील. पालकांनी दिक्षा (DIKSHA) अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे, पाठ्यपुस्तकातील क्युआर कोड स्कॅन करून घटकातील व्हिडीओ मुलांना दाखवावेत, भाषण, वाचन, लेखन व भाषा समृद्धी या घटकांवर हा अभ्यास आधारित आहे, हा प्रकल्प राबविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

असा राबविणार उपक्रम

  • वर्गशिक्षक, पालकांच्या मदतीने उपक्रम 
  • सोशल मिडीयाच्या माध्यमातून सनियंत्रण 
  • पुढील वर्षाच्या अभ्यासाचीही पुर्वतयारी 
  • वाचन, लेखन, भाषण यावर आधारित अभ्यासक्रम 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT