मानव विकास मिशनद्वारे सोसायट्यांचे बळकटीकरण
मानव विकास मिशनद्वारे सोसायट्यांचे बळकटीकरण 
मुख्य बातम्या

मानव विकास मिशनद्वारे सोसायट्यांचे बळकटीकरण

टीम अॅग्रोवन
अकोला : मानव निर्देशांकवाढीसाठी राबवल्या जात असलेल्या मानव विकास मिशनच्या माध्यमातून कौशल्य विकास व रोजगार निर्मितीसाठी जळगाव जामोद तालुक्याला सुमारे एक कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे अटल महापणन विकास योजनेअंतर्गत ११ सेवा सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणाचा भाग म्हणून १६ लाख ५० हजार रुपये दिले जात अाहेत. यातून सोसायटी स्तरावर मिरची पावडर, पिठाची गिरणी आदी उद्योग उभारले जाणार अाहेत.        
मानवी विकास निर्देशांक कमी असल्याने बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात मानव विकास मिशनची अंमलबजावणी केली जात अाहे. या मिशनअंतर्गत विविध उपक्रम सध्या सुरू अाहेत. राज्यात अटल पणन योजनेअंतर्गत सोसायट्यांचे बळकटीकरणाचे काम सुरू झाले अाहे. सहकार खात्याने पुढाकार घेत मानव विकास मिशनमधून सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी प्रस्ताव दिला होता. यानुसार हा निधी मंजूर करण्यात अाला. जळगाव जामोद तालुक्यातील ११ सोसायट्या निवडण्यात येणार अाहेत. रेशीमसह विविध उद्योगांनाही पाठबळ या तालुक्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रेशीम उद्योग उभारणीसाठी ४३ लाखांचा निधी मंजूर झाला अाहे. तसेच, सर्जिकल कॉटनसाठी आणि तालुकास्तरीय शेतमाल विक्री केंद्राच्या निर्मितीसाठी प्रत्‍येकी २० लाख, सफेद मुसळी पावडर बनविण्यासाठी ८ लाख १९ हजार, हळद व मिरची पावडर तयार करण्यासाठी १३ लाख ५४ हजार आणि एलईडी बल्ब प्रकल्पासाठी १२ लाख ४७ हजार असे एकूण एक कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मानव विकासचे अायुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नुकतीच दिली अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT