strawberry
strawberry  
मुख्य बातम्या

चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय राजाश्रय

टीम अॅग्रोवन

अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून देणाऱ्या स्ट्रॉबेरीला महाराष्ट्रात महाबळेश्‍वरनंतर विदर्भाच्या नंदनवनातील चिखलदऱ्याचे वातावरण पोषक ठरले. सलग पाच वर्षांच्या प्रयोगातून ही बाब सिद्ध झाली. मात्र, चिखलदऱ्यातील स्ट्रॉबेरी शेतीला राजाश्रय मिळाला नाही, तर या फळपिकाची स्थिती कॉफीमळ्यासारखीच होण्याची शक्‍यता आहे. कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि श्री शिवाजी उद्यानविद्या विभागाच्या सहकार्याने थंड हवेच्या ठिकाण असलेल्या चिखलदरा तालुक्‍यात २०१५ मध्ये स्ट्रॉबेरी लागवडीचा पहिला प्रयोग केला. स्ट्रॉबेरीच्या ‘विंटरडॉन’ या वाणाला चिखलदऱ्याचे थंड वातावरण व माती पोषक ठरली. प्रयोगाच्या यशस्वितेनंतर ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी दहा गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली. आंबूस-गोड चवीची ही रसाळ स्ट्रॉबेरी पर्यटकांच्या पसंतीला उतरली. प्रतिकिलो २०० ते २५० रुपये दर मिळू लागला. पर्यटकांसोबत ती विदर्भात जेमतेम पोचू लागली. मात्र या वर्षी केवळ तीन-चार शेतकऱ्यांनीच अवघ्या साडेतीन एकरांत स्ट्राबेरीची लागवड केली. चिखलदरा परिसरात यापूर्वी शेतकऱ्यांच्या श्रमाने बहरलेल्या कॉफीमळ्यांवर राजाश्रयाअभावी अवकळा आली. तीच अवस्था स्ट्रॉबेरीची होते की काय, अशी शंका आहे. स्ट्रॉबेरी शेतीचे अर्थकारण स्ट्रॉबेरीच्या एका झाडाला सर्वसाधारणपणे ५०० ते ७५० ग्रॅम फळे लागतात. सात ते दहा रुपये प्रतिरोपांप्रमाणे एक एकरातील रोपांची संख्या सुमारे २० हजारांच्या घरात असते. वाहतूक आणि मशागत, लागवड असा प्रतिएकरी एकूण दोन-सव्वादोन लाखांचा खर्च येतो. याउलट एकरी किमान साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रतिक्रिया स्ट्रॉबेरी पिकातून पाच वर्षांत आत्तापर्यंत हमखास उत्पन्न मिळाले. जास्त उत्पादन झाल्यास साठवणुकीची सोय नाही. रोप खरेदीवर एका वेळी मोठा खर्च होत असल्याने व शासनाकडून आर्थिक स्वरूपात मदत नसल्याने शेतकरी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी धजावत नाही. - गजानन शनवारे, स्ट्रॉबेरी उत्पादक, रा. मोथा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT