सालपे येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांकडून ‘रास्ता रोको’
सालपे येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांकडून ‘रास्ता रोको’ 
मुख्य बातम्या

सालपे येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांकडून ‘रास्ता रोको’

टीम अॅग्रोवन

लोणंद, जि. सातारा ः साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने सालपे (फलटण) येथील (कै.) भगवानराव शिंदे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे उसाचे ७० हजार रुपयांचे बिल त्यांच्या नावावर त्वरित जमा करावे. तसेच कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यावर कडक कारवाई करावी. कारखान्याने २०१७ मध्ये गाळप केलेल्या सर्व शेतकऱ्यांची ऊसबिले त्वरित द्यावीत. या मागणीसाठी सोमवारी (ता. १४) सालपे (फलटण) येथे पुणे -सातारा मार्गावर पंकज शिंदे (सालपे, फलटण) व बाळासाहेब शेळके (निंबोडी, खंडाळा) यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. 

या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने फलटण महसूल विभागाचे अधिकारी व लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले. गावातील भैरवनाथ मंदिरात एकत्र येऊन त्यानंतर घोषणा देत पुणे-सातारा मार्गापर्यंत मोर्चाने येऊन सालपे एसटी बस स्थानकासमोर १० ते १५ मिनिटे रास्ता रोको केला. 

या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. साखरवाडी साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ खोटारडे आहे. पाच ते सहा हजार शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ५० ते ५५ कोटी रुपये उसाचे बिल या शेतकऱ्यांना गेल्या दीड वर्षांपासून दिले नाही. स्वतःसाठी गाड्या, बंगले, हॉटेल व पोल्ट्री उभारण्यासाठी पैसे आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. मात्र, हे आम्हा शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत. ते आम्ही घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. यासाठी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. अन्यथा हा संघर्ष थांबणार नाही. यापेक्षाही अधिक तीव्र अांदोलने छेडण्याचा इशाराही या वेळी पंकज शिंदे व बाळासाहेब शेळके यांनी बोलताना दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT