चाळीसगाव, जि. जळगाव : गिरणा धरणात झालेला पाणीसाठा.
चाळीसगाव, जि. जळगाव : गिरणा धरणात झालेला पाणीसाठा. 
मुख्य बातम्या

बहुळा, बोरी प्रकल्पाचा साठा प्लसमध्ये

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरड्या असलेल्या पश्‍चिम भागातील बोरी व बहुळा या मध्यम प्रकल्पांचा साठा प्लसमध्ये आला आहे. बहुळामध्ये बुधवारी (ता. ७) सकाळी पावणेदहापर्यंत २.०८ टक्के, तर बोरीमध्ये १.७५ टक्के जलसाठा झाला होता. पावसाची संततधार या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात मागील दोन दिवस सुरू होती. यामुळे प्रकल्पांचा साठा प्लसमध्ये आला आहे. पश्‍चिम भागातील अंजनी, हिवरा, अग्नावती, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांमध्ये मात्र शून्य टक्केच साठा आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणाचा साठा मागील २४ तासांत (बुधवारी सकाळी पावणेदहापर्यंत) ५३.७४ टक्‍क्‍यांपर्यंत पोचला. मंगळवारी सकाळी १० पर्यंत या धरणाचा साठा ४२ टक्के एवढा होता. जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतालगतच्या रावेर तालुक्‍यातील मंगरूळ, अभोरा व सुकी प्रकल्पाचा साठा वाढला आहे. यावलमधील मोर प्रकल्पाचा साठा मात्र मागील २४ तासांत फारसा वाढलेला नाही. जामनेरातील तोंडापूर प्रकल्प १०० टक्के भरला आहे. वाघूरमधील साठा फारसा वाढलेला नसून, तो बुधवारी सकाळी १० पर्यंत ३१.६९ टक्के एवढा होता. तापी नदीवरील मुक्ताईनगरनजीकच्या हतनूर धरणाचे आठ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. धुळे जिल्ह्यातील कनोली, सोनवद प्रकल्प कोरडेच आहेत. तर पांझरा, मालनदाव, बुराई, जामखेडी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.  विविध प्रकल्पांमधील साठा (बुधवारी सकाळी पावणेदहापर्यंत, टक्‍क्‍यांमध्ये) ः गिरणा ५३.७४, वाघूर ३१.६९, अभोरा ६०.२२, मंगरूळ ५२.१५, सुकी ४३.७३, मोर २९.८१. धुळे जिल्हा ः अनेर १९.०४ (१० दरवाजे पूर्ण उघडे), करवंद ३७.५७, अमरावती २४.२८. नंदुरबार ः दरा १००, रंगावली १००, शिवन ७३. धुळे जिल्ह्यातील तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज व नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सारंगखेडा बॅरेजचे २६, तर प्रकाशा बॅरेजचे २७ दरवाजे पूर्ण उघडे आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT