एसटी बसमध्ये दुधाला `नो एन्ट्री`
एसटी बसमध्ये दुधाला `नो एन्ट्री` 
मुख्य बातम्या

एसटी बसमध्ये दुधाला `नो एन्ट्री`

हरी तुगावकर 

लातूर ः राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये वाहतूक करून शहरी भागात दूध आणून त्याची विक्री करतात. अनेक जणांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा यावर उदरनिर्वाह चालतो. अशा दूध उत्पादकांना एस. के. ट्रान्सलाइन्स प्रा. लि.कडून पासही दिले जात होते. पण या कंपनीने नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करत दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. महामंडळाच्या भूमिकेकडेच आता त्यांचे लक्ष लागले आहे.   राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पार्सल कुरिअरची वाहतूक करण्यासाठी महामंडळाने एस. के. ट्रान्सलाइन्स प्रा. लि. या कंपनीशी करार केला आहे. एक नोव्हेंबर २०११ ते ३१ आक्टोबर २०१८ या कलावधीसाठी अधिकृत परवानाधारक म्हणून महामंडळाने या कंपनीची नियुक्ती केली होती. तसा करारही करण्यात आला होता.  पण सांगली विभागाने एक अहवाल महामंडळास सादर केला होता. यात जास्तीत जास्त पाचशे किलो पार्सल वाहतुकीची मर्यादा असताना दोन वेळा सहाशे किलो पार्सलची वाहतूक करणे, जास्ती जास्त ५० हजार एवढ्या किमतीच्या मालाची एकावेळी वाहतूक करण्याची मर्यादा असतानाही त्या पेक्षाही जास्त किमतीच्या पार्सलची वाहतूक करणे, डॉकेटमध्ये जाणीवपूर्वक खोट्या नोंदी करून अधिक किमतीच्या मालाची वाहतूक करणे, नाशवंत मालाची वाहतूक करताना सदर मालाच्या बांधणीच्या अानुषंगाने असलेल्या नियमांचे पालन न करणे असे प्रकार दिसून आले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT