राज्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी
राज्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी 
मुख्य बातम्या

राज्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी

टीम अॅग्रोवन

पुणे : मॉन्सून राज्यात दाखल होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. याअगोदरच राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत. दुपारपर्यंत उन्हाचा चटका असला, तरी दुपारनंतर हवामानात बदल होऊन अचानक ढगाळ हवामान होत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहेत.  बुधवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत नगरमधील कर्जत, जामखेड, नेवासा, बीड, लातूर येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचा शिडकावा झाला. तर, जामखेडमधील हळगाव येथे छावणीतील जनावरांवर वीज पडून दोन जनावरे दगावली.  वातावरणातील बदलामुळे कमाल तापमानात घट होत आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उर्वरित राज्यात वाढत्या उकाड्यामुळे कमाल तापमान अजूनही कायम आहे. नागपूर ४६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.    विदर्भात काहीअंशी असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सकाळपासून उन्हाचा चटका बसत आहे. या चटक्यामुळे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्यावर जात आहे. विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही उन्हाच्या झळा अजूनही तीव्रच आहे. यामुळे या भागात अजूनही कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. खान्देशात ४१ ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान तापमान आहे. तर, मध्य महाराष्ट्रात अंशतः असलेल्या ढगाळ हवामानामुळे किंचित घट झाली आहे. त्यामुळे या भागात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. तर, कोकणातील वातावरणात अंशतः बदल होत असल्याने कमाल तापमानात चढउतार सुरू आहे.    बुधवारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३६.८ (१.५), जळगाव ४३.० (१.४), कोल्हापूर ३२.७ (-०.८), महाबळेश्‍वर ३०.१ (२.९), मालेगाव ४१.० (३.०), नाशिक ३७.१ (०.६), सांगली ३२.२ (-२.३) सातारा ३७.४ (३.३), सोलापूर ३७.० (-१.६), मुंबई (सांताक्रूझ) ३४.४ (१.०), मुंबई ३४.४ (०.७), अलिबाग ३५.१ (२.३), रत्नागिरी ३२.६ (०.२), डहाणू ३५.६ (१.६), औरंगाबाद ४१.८ (३.७), बीड ४२.५ (३.७), परभणी ४३.७ (३.२), नांदेड ४३.५ (२.९), उस्मानाबाद ४०.७ (३.३) अकोला ४५.० (३.९), अमरावती ४४.८ (३.९), बुलडाणा ४०.२ (२.८), ब्रह्मपुरी ४५.८ (४.०), चंद्रपूर ४३.२ (०.७), गोंदिया ४३.० (०.८), नागपूर ४६.४ (४.४), वाशीम ४३.०, वर्धा ४५.८ (४.२) यवतमाळ ४५.० (४.२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT