State minimum temperature rise
State minimum temperature rise 
मुख्य बातम्या

राज्याच्या किमान तापमानात वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे : किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात वाढलेली हुडहुडी कमी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे.  शुक्रवारी (ता. २४) निफाड येथे नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २५) किमान तापमान वाढ होऊन गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेले काही दिवस किमान तापमानात वेगाने घट झाली. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात किमान तापमान १० अंशांच्याही खाली आले होते. मात्र उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची ओसरल्यानंतर राज्यातही गारठा कमी झाला. दिवसाच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच आहेत. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक ३२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात मंगळवारपासून पावसाची शक्यता राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने थंडी कमी होणार आहे. तर बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाला पोषक हवामान होणार असल्याने सोमवारी (ता. २७) विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मंगळवारपासून (ता. २८) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.३ (१२.४), जळगाव ३०.६ (१०.५), कोल्हापूर २९.५ (१६.६), महाबळेश्‍वर २४.७ (१४.४), मालेगाव २६.८ (१३.२), नाशिक ३०.१ (१२), निफाड २९.५ (८.८), सांगली ३०.३ (१५.२), सातारा २८.२ (१५.२), सोलापूर ३२.४ (१३), सांताक्रूझ २९.४ (१८.४), अलिबाग २८.८ (१९.१), डहाणू २८.६ (१७.३), रत्नागिरी ३१.४ (१७.१), औरंगाबाद २९.७ (१३.५), नांदेड ३१ (१४.०), उस्मानाबाद - (१३.९), परभणी ३१.२ (१३.५), अकोला ३२.५ (१३.८), अमरावती ३१ (१३.७), बुलडाणा ३० (१५.३), ब्रह्मपुरी ३१.१ (१२.६), चंद्रपूर २८ (१२.२), गडचिरोली २९ (१२.४), गोंदिया २७.५ (१०), नागपूर २९.१ (१०.९), वर्धा २९.९ (१२.४), वाशीम ३२ (११.५), यवतमाळ ३१ (१४).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT