State, foreign workers Dera in Kadwanchi area
State, foreign workers Dera in Kadwanchi area 
मुख्य बातम्या

राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची परिसरात डेरा 

टीम अॅग्रोवन

जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कडवंची परिसरात दर वर्षी येणाऱ्या लातूर जिल्ह्यातील खिल्लारीसह उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरात सीमेला लागून असलेल्या भागातील मजुरांचा डेरा पडला आहे. जवळपास दोन ते तीन महिने या परिसरात वास्तव्य करणारे हे मजूर रोजगाराच्या संधीमुळे इकडे येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  जालना जिल्ह्यातील कडवंची परिसर द्राक्षाचे आगर मानले जाते. परिसरातील नंदापूर, धारकल्यान, पिरकल्यान, नाव्हा, वरूड, वखारी, वडगाव आदी गावांमध्ये जवळपास १२०० ते १३०० हेक्‍टरवरवर द्राक्ष बागांचा विस्तार आहे. साधारणत: सप्टेंबर, ऑक्‍टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यांत द्राक्ष बागांची छाटणी केली जाते. यासाठी मजुरांची कमतरता भासते, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लातूर जिल्ह्यातील खिल्लारीसह, बिहार, उत्तर प्रदेश व गुजरातच्या सीमावर्ती भागातील मजूर शेतकऱ्यांच्या बोलावण्यावरून या भागात येत असतात. आजघडीला एकट्या कडवंची गावात विविध ठिकाणांहून आलेल्या जवळपास २०० मजुरांचा समावेश आहे. तर आसपासच्या परिसरात मिळून ४५० ते ५०० मजूर कार्यरत आहेत. साधारत: ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर व एप्रिल- मे, असे चार महिने किंवा काम मिळाल्यास त्यापेक्षा जास्त काळ हे मजूर कडवंची परिसरात असतात, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.  एकरी १५ हजार मजुरी  विविध ठिकाणांहून येणारे हे मजूर द्राक्ष बागायतदारांकडे ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये छाटणी, दोन वेळा पेस्ट लावणे व फेलफूट काढून देण्याचे काम करतात. त्यासाठी प्रति एकर १५ ते १६ हजार रुपयांची मजुरी उत्पादकांना त्यांना द्यावी लागते. या शिवाय एप्रिलमध्येही खरड छाटणी, पेस्ट, सबकेन करणे, शेंडा स्टॉप आदींसह काडी बनवून देण्यासाठीही याच प्रमाणात एकरी मजुरी दिली जात असल्याची माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली.  प्रतिक्रिया  माझ्याकडे द्राक्ष बागेत कामासाठी महाराष्‍ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागातील १५ मजूर कामाला आहेत. आपल्या भागात कुशल मजुरांची कमतरता असल्याने वेळेत काम होण्यासाठी या मजुरांना पाचारण करावेच लागते. ऑक्‍टोबर, नोव्हेंबर व एप्रिल ते मे, असे चार महिने हे मजूर आमच्या बागांमध्ये राबतात.  -चंद्रकांत क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक कडवंची  प्रतिक्रिया  माझ्या द्राक्ष बागेत काम करण्यासाठी आजही २० जोडपे इतर भागांतून आलेले आहेत. दर वर्षीचे ते येतात, मजुरांच्या कमतरतेमुळे त्यांना बोलवून द्राक्ष बागांमधील छाटणी, पेस्ट, फेलफूट काढणे, काडी बनवून घेणे आदी कामे तत्परतेने करून घेतली जातात.  -विनोद क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक कडवंची

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT