मुख्य बातम्या

राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक गोंधळामुळे स्थगित

टीम अॅग्रोवन

पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक प्रक्रियेदरम्यान एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. या संदर्भात बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी चारपर्यंत सुरू होती.   महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव आदी पदाधिकारी निवडीसाठी साेमवारी (ता. १९) संचालक मंडळाची सभा बाेलविण्यात आली हाेती. सभेचे कामकाज सुरू हाेऊन प्राेसेडिंगवर सह्या झाल्यानंतर गोंधळ सुरू झाला. या दरम्यान, एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर दाखवल्याने गोंधळात भर पडली. यामुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे आणि निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात अाल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवले आहे. या वेळी बाेलताना विद्या पाटील आणि सुनीता पाटील म्हणाल्या, ‘‘संघाच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पाेलिस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत सुरू हाेती. प्राेसेंडिंगवर सह्या झाल्यानंतर आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी कार्यकर्त्यांसह सभागृहात प्रवेश करीत गाेंधळ घालण्यास सुरवात केली. या वेळी टेबल, खुर्च्या आणि मतपेट्यादेखील फेकून देण्यात आल्या. हा प्रकार सरकारपुरस्कृत असून, त्यांच्याकडे एक मत कमी असल्याने त्यांनी ही प्रक्रिया रद्द करण्यासाठी हा प्रकार केला आहे.’’ याबाबत आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘आमच्याकडे १३ संचालक असताना आमचा विजय निश्‍चित हाेता. मात्र विराेधकांनी भाडाेत्री गुंड आणून सभागृहात गाेंधळ घातला. या वेळी माझ्याबराेबर असणाऱ्या मुंबई सहकारी बँकेचे विद्यमान संचालक नितीन बनकर यांना अमोल घुले नावाच्या व्यक्तीने रिव्हॉल्व्हर दाखवत धमकविले, यामुळे सभागृहात गाेंधळ झाला. संबंधित व्यक्तीच्या विराेधात आम्ही बंडगार्डन पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.’’ दरम्यान, कायदा सुवस्थेच्या कारणास्तव सभा तहकूब करण्यात आली आहे. पदाधिकारी निवडीच्या सभेचे सूचनापत्र नव्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानंतर काढण्यात येईल, असे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांनी संचालकांना पाठविले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT