कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची नियुक्ती रद्द
कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची नियुक्ती रद्द 
मुख्य बातम्या

कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची नियुक्ती रद्द

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह आठ सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने तसे आज (ता.२) परिपत्रक काढले असून भाजप सरकारच्या काळात या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. 

राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत व ग्राहकांसाठी वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा या दुहेरी उद्येशाने २३ एप्रिल २०१५ रोजी ‘राज्य शेतमाल भाव समितीचे राज्य कृषी मूल्य आयोग’ मध्ये रुपांतर करण्यात आले होते. सदर राज्य कृषी मूल्य आयोगावर शेतकरी नेते पाशा पटेल यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती तत्कालीन भाजप सरकारने केली होती. 

अध्यक्षांसह आठ सदस्यांच्याही नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या सदस्यांत प्रा. सुहास पाटील (सोलापूर), अनिल पाटील (पालघर), प्रशांत इंगळे (वर्धा), किशोर देशपांडे (औरंगाबाद), अच्युत गंगणे (बीड), डॉ.संपतराव पाटील (कोल्हापूर), विनायक जाधव (सांगली), शिवनाथ जाधव (नाशिक) यांचा समावेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT