विशेष पीक संरक्षण मोहिमेला सुरवात
विशेष पीक संरक्षण मोहिमेला सुरवात 
मुख्य बातम्या

कृषी विद्यापिठातर्फे विशेष पीक संरक्षण मोहिमेस प्रारंभ

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीअंतर्गत ‘विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विशेष पीक संरक्षण मोहिमेचा शुभारंभ बुधवारी (ता. १) करण्यात आला.

औरंगाबादमधील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प कार्यालयातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद डॉ. तुकाराम मोटे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरवात करण्यात आली. या वेळी सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार तसेच कार्यक्रम समनव्यक दीप्ती पाटगावकर उपस्थित शेतकरी आणि इतर कृषी शास्त्रज्ञ उपस्थित होते. या मोहिमेच्या माध्यमातून शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून शेतकऱ्यांना परिस्थितीनुरूप शास्त्रीय मार्गदर्शन करणार आहेत.

गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपायोजनांची प्रभावीरीत्या अंमलबजावणी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून प्रयत्न करण्याच्या सूचना आहेत. या पीक संरक्षण मोहिमेच्या माध्यमातून याविषयी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत. औरंगाबाद व जालना जिल्ह्याचे पथकप्रमुख म्हणून डॉ. एस. बी. पवार काम पाहणार आहेत. तर कृषी विभाग व कृषी विद्यापीठ तसेच शेतकरी यांच्यातील औरंगाबाद व जालना जिल्हा समन्वयक म्हणून रामेश्वर ठोंबरे काम पाहणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासाठी डॉ. किशोर  झाडे, डॉ. एस. बी. बंटेवाड, डॉ. दर्शना भुजबळ, डॉ. संजय पाटील, प्रा. दीप्ती पाटगावंकर आदी तज्ज्ञ विविध भागांतील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून थेट मार्गदर्शन करणार आहेत.

कपाशी हे जिल्ह्याचे प्रमुख पीक असल्याने त्या पिकावर गुलाबी बोंड अळीसह इतर कीड रोगांविषयी सल्ला व मार्गदर्शनाचे काम केले जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या इतर पिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे कामही तज्ज्ञांच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २५ ऑगस्टपर्यंत ही विशेष पीक संरक्षण मोहीम राबविली जाणार आहे. गटचर्चा, क्षेत्रीय भेट, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे असे या मोहिमेचे स्वरूप राहणार आहे. जालना जिल्ह्यात डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. पी. एस. घंटे, डॉ. एस. पी. गोसावी हे काम पाहणार असल्याची माहिती कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT