Start quarantine, help centers on the lines of fodder camps
Start quarantine, help centers on the lines of fodder camps 
मुख्य बातम्या

चारा छावण्यांच्या धर्तीवर क्वारंटाइन, मदत केंद्रे सरू करा 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः चारा छावणीच्या धर्तीवर संस्थांच्या माध्यमातून जागोजागी कोरोना क्वरांटाइन व मदत केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी किसान आर्मी व वॅाटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सध्या कोरोना बचाव मोहीम ही केवळ प्रशासकीय मोहीम झाली आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि इतर घटकांचा सहभाग नाही. त्यामुळे कोरोनाची समस्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यामध्ये संस्थांची मदत घेतल्यास मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाचा भारही बऱ्यापैकी कमी होणार आहे. साहजिकच रुग्णांबरोबर नागरिकांचीही सोय होईल, जागोजागी क्वरांटाइन केंद्र आणि मदत केंद्रांच्या स्वतंत्र यंत्रणेमुळे भविष्यातील धोकाही कमी होऊ शकेल. 

सध्या सगळीकडे वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॅाक्टर्स, नर्स किंवा अन्य कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेने कमीच आहे. त्यामुळे रुग्ण वाढले, तर त्याचे व्यवस्थापन कसे होणार, त्यासाठी त्या-त्या भागातील या केंद्रामुळे मोठी मदत होईल, ते कसे होईल, याचा मसुदाही या निवेदनासोबत श्री. कदम यांनी जोडला आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशीही आपण बोलले असल्याचे ते म्हणाले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT