येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवात
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवात 
मुख्य बातम्या

येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवात

टीम अॅग्रोवन

नाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. काही भागांत चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची लगबग सुरू केली; मात्र काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू ठेवली आहेत. मात्र, येवला तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेततळ्यात तसेच विहिरीत साठवलेल्या पाण्याच्या भिस्तीवर ठिबक सिंचनच्या माध्यमातून कापूस लागवडीला सुरवात केली आहे.  जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली खरी मात्र वादळी वारा अधिक असल्याने शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. काही तालुक्‍यांमध्ये अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी मशागतीचीच कामे सुरू ठेवली आहेत. काही भागात चांगला पाऊस झाल्याने शेतशिवारात  पेरणीची लगबग सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी कापूस लागवड सुरू केली आहे.

मजुरांच्या हाताला काम  दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीवर अवलंबून मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना थोड्या फार प्रमाणात रोजगार मिळायला सुरवात झाली आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत अडकलेला बळिराजा थोड्या फार प्रमाणात सुखावला असून खरीप हंगामाची कामे सुरू केली आहेत. तर मजुरांमध्येही समाधान दिसून येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

SCROLL FOR NEXT