माजलगाव, जि. बीड ः खरीप हंगाम मॉन्सूनोत्तर पावसामुळे हातचा गेला असला तरी भूगर्भातील पाणीपातळीत मोठी वाढ  झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करण्याची लगबग सुरू केली आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारी, हरभरा, गहू पिकांची पेरणी होत आहे.

मुख्य बातम्या

बीड जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग

टीम अॅग्रोवन

माजलगाव, जि. बीड ः खरीप हंगाम मॉन्सूनोत्तर पावसामुळे हातचा गेला असला तरी भूगर्भातील पाणीपातळीत मोठी वाढ  झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करण्याची लगबग सुरू केली आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ज्वारी, हरभरा, गहू पिकांची पेरणी होत आहे.

तालुक्‍यात रब्बी हंगामाचे मोठे क्षेत्र आहे. परतीच्या दमदार पावसामुळे शेतातील पाणीसाठ्यात झालेली वाढ व तब्बल पंधरा दिवस ते महिनाभर वाफसा झाला नव्हता, कपाशी वेचणीसाठी मोठा कालावधी लागत आहे. कापूस वेचणीसाठी मजुरांची उपलब्धता होत नाही. एकंदरीत त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. 

शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग पेरलेल्या शेताची मशागत सुरू केली असून रब्बी पेरणीसाठी शेत लवकरात लवकर तयार करण्यासाठी ट्रॅक्‍टरने नांगरणी करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड होत असल्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणून तालुक्‍याची वेगळी ओळख होती; परंतु पाच ते सहा वर्षांपासून अत्यल्प पाऊस व दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीची पेरणी अत्यल्प होत असे. परिणामी, जनावरांसाठी लागणारा चारा उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण होत होता. यावर्षी मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड होत असल्याने जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT