Soybean sowing increased in Khandesh
Soybean sowing increased in Khandesh 
मुख्य बातम्या

सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढली

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र यंदा सुमारे चार हजार हेक्टरने वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज आहे. पिकाची स्थिती चोपडा, पाचोरा भागात चांगली आहे. इतर भागात मात्र कमी पावसामुळे फटका बसला आहे.

यंदा कोरोनाच्या संकटात मका, बाजरी, कापूस उत्पादकांना फटका बसला. कापसाला कमी दर मिळाले. त्याची विक्री शासकीय यंत्रणांमध्ये रांगा लावून करावी लागली. बाजरी, मक्याचे दर मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले. त्याचीही विक्री बाजारात करताना नाकीनऊ आले. यामुळे शेतकरी संकटात सापडले. आर्थिक कोंडी झाली. संबंधित पिकांच्या विक्रीबाबत अडचणी आल्याने व बाजारात मागणी कमी असल्याने खरिपात शेतकरी तृणधान्य, कडधान्याएवजी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत.

सोयाबीनचे दर मागील हंगामात २४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण सोयाबीनची आयात कमी होऊ शकते. कोरोनामुळे जगभरात माल वाहतूक, परकी देशातील विक्रीसंबंधी अडचणी येत आहेत. यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. तसेच रावेर, यावल, चोपडा, भुसावळ, जामनेर या भागात काही शेतकऱ्यांनी तीळ, भुईमूग पेरणीदेखील केली आहे.

सोयाबीनची पेरणी खानदेशात जळगाव जिल्ह्यात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाली आहे. नेमकी आकडेवारी पुढील आठवड्यात प्राप्त होऊ शकते. परंतु सद्यःस्थितीमध्ये सोयाबीनची पेरणी सर्वत्र आटोपली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल, जामनेर व पाचोरा भागात सोयाबीनचे पीक अधिक आहे. तर धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा व तळोदा भागात सोयाबीनची पेरणी अधिक झाली आहे. खानदेशात मिळून सुमारे ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. मागील हंगामात खानदेशात सुमारे ३६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती.

सोयाबीनचे हमीभाव वाढण्याची अपेक्षा जळगाव जिल्ह्यात यंदा २८ ते २९ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी अपेक्षित होती. सोयाबीन खरेदीसाठी शासनही यंदा पुढाकार घेणार आहे. कारण शासनाने तेलबिया उत्पादन व खाद्यतेलासंबंधी स्वयंपूर्णतेचा नारा दिला आहे. हमीभावात अधिकाधिक खरेदी होईल, अशी अपेक्षादेखील सोयाबीन उत्पादकांना आहे, असे चित्र खानदेशात दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT