भेसळीच्या संशयावरून १९ लाखांचा सोयाबीन तेलसाठा जप्त 
भेसळीच्या संशयावरून १९ लाखांचा सोयाबीन तेलसाठा जप्त  
मुख्य बातम्या

भेसळीच्या संशयावरून १९ लाखांचा सोयाबीन तेलसाठा जप्त 

टीम अॅग्रोवन

भंडारा  : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील खाद्यतेल विक्रेते, मिठाई व खवा विक्रेत्यावर धाडी घालून अन्न व औषध प्रशासन विभागाने १९ लाख २२ हजार ४२९ रुपये किमतीच्या सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे. अन्य विक्रेत्यावरही या मोहिमेत कारवाई करण्यात आली. 

दिवाळी सणानिमित्त खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन, भंडारा व गोंदिया कार्यालयातर्फे विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. खाद्य तेल रिपॅक करणारे विक्रेते, मिठाई, खवा विक्रेत्यांवर छापे टाकून सहा खाद्यतेल रिपॅकर्स पेढ्यांकडून एकूण किलो १७ हजार ५२३.८ रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत १९ लाख २२ हजार ४२९ रुपये इतकी आहे. में. गुरुनानक आईल मिल, माताटोली रोड ,गोंदिया. मे. भगत कंवरराम ऑइल इंडस्ट्रीज, पिंडकेपार रोड, गोंदिया. मे. शीव ऑइल मिल, मुर्री रोड, गोंदिया. मे. गुरुनानक तेल भांडार, गौशाला बार्ड, गोंदिया. में. के. जी . एन . ट्रेडर्स, लाखनी, जि. भंडारा. मे. ए. वाय. ऑइल पॅकर्स, मेन रोड, गडेगाव, ता. लाखनी, जि. भंडारा. यांच्याकडून खाद्य तेल रिपॅक करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या टिनांच्या डब्यांचा पुर्नवापर होत असल्याने अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या तरतुदी अंतर्गत जन स्वास्थ, सुरक्षेच्या कारणास्तव खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच लाखनी, जि. भंडारा येथील दोन खाद्य तेल रिपॅकर्सकडे कायद्याच्या तरतुदी अंतर्गत स्वत: ची स्वतंत्र व सुसज्ज प्रयोगशाळा नसल्याने सदर पेढ्यांना प्रयोगशाळा स्थापन करेपर्यंत खाद्य तेलाची विक्री तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

में. सदगुरू अनाज भंडार, दुर्गा चौक गोंदिया या पेढीतून भेसळीच्या संशयावरून एकूण ६ हजार ८६० किमतीची ९८ किलो वटाणा पावडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. मे. बावनथडे खोवा विक्री केंद्र, रामनगर, गोंदिया येथे एकूण किंमत २० हजार ७२० रुपये किमतीचे १४८ किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात विशेष मोहिमे अंतर्गत एकूण ४९ विविध अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आले. त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न औषधी प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT