सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन हजारांपर्यंत  Soybean harvest rate Up to three thousand per acre
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन हजारांपर्यंत  Soybean harvest rate Up to three thousand per acre 
मुख्य बातम्या

सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन हजारांपर्यंत 

टीम अॅग्रोवन

अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे सोयाबीन वाण काढणीसाठी तयार होत आहे. या वर्षी सोयाबीन मळणी प्रतिबॅग अडीच ते तीन हजारांपर्यंत गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. शिवाय काही ठिकाणी मजुरांचीही समस्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच भेडसावू लागली आहे.  या विभागात सोयाबीन हे खरीपातील प्रमुख पीक आहे. यंदाही वऱ्हाडात सोयाबीनची लागवड सुमारे नऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झालेली आहे. यात प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार, अकोल्यात २ लाख २२ हजार आणि वाशीम जिल्ह्यात ३ लाख २ हजार हेक्टर एवढी सोयाबीनची लागवड झालेली आहे. सोयाबीनमध्ये प्रामुख्याने जेएस ३३५ या वाणाचे क्षेत्र अधिक आहे. ही सोयाबीन येत्या १५ दिवसांत सर्वत्र काढणीसाठी तयार होत आहे. काही कमी कालावधीचे सोयाबीन वाण शेतकऱ्यांनी पेरले होते. त्यांची काढणी सुरू सुद्धा झाली आहे. आता एकाच वेळी सोयाबीनची काढणी सुरू होणार असल्याने शेतकरी आतापासूनच मजुरांची व्यवस्था करू लागले. मजुरांच्या टोळ्या सोयाबीनच्या उभ्या पिकाची कापणीसाठी बोलणी करीत आहेत. मालेगाव, वाशीम भागात सोयाबीनची एक बॅग (एक एकर) लागवड क्षेत्रासाठी अडीच ते तीन हजारांपर्यंत मागणी केली जात आहे. तर मजुरांची एक जोडी ९०० ते १००० रुपये प्रतिदिवस मजुरी मागत आहे. अतिपावसामुळे शेतरस्ते खराब झालेले आहेत. शेतांमध्येही ओलावा असल्याने यंत्रांचा वापर यंदा कमी प्रमाणात होत आहे. 

प्रतिक्रिया हवामान खात्याने यंदा पावसाचा अंदाज ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाखवला आहे. पुढील १५ दिवसांत सोयाबीनची काढणी करायची आहे. अशा स्थितीत सोयाबीन कापणीसाठी मजुरांची जुळवाजुळव आतापासून करावी लागत आहे. मजुरांची समस्या असल्याने तीन हजारांपर्यंत एकरी दर मागितल जात आहे.  -विनोद पाटील, शेतकरी, सुडी, जि. वाशीम   

प्रतिक्रिया

आमच्या भागात प्रति एकरी तीन हजारांप्रमाणे सौदे झालेले आहेत. गावात सोयाबीन सोंगणी मशीन असल्याने मजुरांची अडचण भासलेली नाही. या वर्षी काही जणांनी लवकर येणाऱ्या सोयाबीन वाणांची पेरणी केल्याने व काहींनी थोड्या उशिरा येणाऱ्या जातींचा पेरा केल्याने काढणीची स्पर्धा आमच्याकडे तरी नाही.  -मोहन जगताप, शेतकरी, वळती, जि. बुलडाणा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT