सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणी
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणी 
मुख्य बातम्या

सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणी

टीम अॅग्रोवन

मुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. खरेदीला सुरवात १५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ हजार ८८० रुपये असा जाहीर केला आहे. चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी १ ऑक्टोबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा. केंद्र शासनाकडे हमीभावाने सोयाबीन खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव १८ सप्टेंबर २०२० ला पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT