रब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणी
रब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणी 
मुख्य बातम्या

रब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह चारा म्हणून उपयोगी ठरणाऱ्या रब्बी ज्वारीची एक लाख ९ हजार ८५६ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १२) ७३.९९ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली. त्यात माण तालुका सर्वा पुढे आहे.   

जिल्ह्यात रब्बी पेरणीस वेग आला आहे. सध्या गहू, हरभरा मका पिकांची पेरण्या सुरू आहेत. जिल्ह्यात पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ५८ हजार ९४४ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ७३.९९ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. तिचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार १११ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख नऊ हजार ८५६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

थंडीत वाढ होऊ लागल्याने हरभरा, गहू पिकांच्या पेरणीस वेग आला आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८८३ हेक्‍टर असून, त्यापैकी २० हजार ३९७ हेक्‍टर क्षेत्रावर, गहू पिकांचे ३४ हजार ४७३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्याची १९ हजार ४७८ हेक्टर क्षेत्रावर, तर मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, त्याची आठ हजार ५०८ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. रब्बी ज्वारीचा लागवड कालावधी संपत आला असल्याने उद्दिष्टे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. हरभऱ्यांच्या हमीभावात वाढ केल्याने त्याच्याकडे कल वाढत आहे. पाणीटंचाई भीषण होऊ लागल्याने चारा पिके घेण्याकडे कल वाढला असल्याने मक्याची लागवड जास्त होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात माण तालुक्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा आहेत. या तालुक्याचा तीव्र दुष्काळ यादीत समावेश आहे. मात्र, या ठिकाणी सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे पिके वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT