Sowing on a quarter of a lakh hectares in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी हंगाम अपेक्षेपेक्षा अधिक क्षेत्रात उभा राहील, हा अंदाज खरा ठरत असून, आतापर्यंत एक लाख २५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली आहे. तर, मका, गहू पिकांची पेरणी सुरू आहे. गव्हाची पेरणीदेखील पूर्ण होत आली आहे. या आठवड्यात गहू पेरणी पूर्ण होईल, अशी स्थिती आहे.

खानदेशात सुमारे चार लाख हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहणार आहे. यात सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची होणार आहे. अद्याप काबुली हरभऱ्याची पेरणी सुरू आहे. हरभऱ्याचे क्षेत्र धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, रावेर, यावल भागात सात ते आठ हजार हेक्टर होण्याचा अंदाज आहे. 

हरभऱ्याची जळगाव जिल्ह्यात ७५ ते ८० हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील बऱ्यापैकी हरभरा पेरणी आटोपली आहे. दादरची सुमारे २८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. संकरित ज्वारीची पेरणी सुरू आहे. ज्वारीची एकूण पेरणी ४० हजार हेक्टरपर्यंत जाईल. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे ७५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर, धुळे व नंदुरबारात सुमारे ५० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. कांदा, बाजरीची पेरणी अजून सुरू झालेली नाही. कांद्याची सुमारे १२ ते १४ हजार हेक्टरवर पेरणी होईल. बाजरीचीदेखील शिरपूर, चोपडा, शहादा, तळोदा, पाचोरा आदी भागात मिळून सुमारे १२ ते १३ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे. 

गहू पेरणी रखडत

गव्हाची पेरणी ढगाळ वातावरणामुळे रखडत सुरू आहे. मध्यंतरी ज्वारी पिकात विविध संकटांमध्ये तूट आली. यात काही शेतकऱ्यांना कोरडवाहू ज्वारी पीक मोडावे लागले. नव्याने  पेरणी करावी लागली आहे. जळगाव, चोपडा भागात ही समस्या तयार झाली होती.

आमच्या भागात रब्बी पिकांमध्ये कोरडवाहू दादर, हरभऱ्याची पेरणी आटोपली आहे. सध्या काबुली हरभरा, मका, गहू पेरणी सुरू आहे. गहू पेरणी कमी दिसत आहे. परंतु, संकरित ज्वारीची पेरणी वाढत आहे.

- संजय पाटील, शेतकरी, गरताड (जि.जळगाव).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT