खानदेशातील तापीकाठी कोरडवाहू रब्बीची पेरणी
खानदेशातील तापीकाठी कोरडवाहू रब्बीची पेरणी 
मुख्य बातम्या

खानदेशातील तापीकाठी रब्बीची कोरडवाहू पेरणी

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशातील तापी नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू रब्बी पिकांमध्ये दादर (ज्वारी) व हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आहे. गिरणा पट्ट्यात अजून पेरणी सुरू झालेली नसल्याचे चित्र आहे. खानदेशात दादर, हरभरा, मका मिळून सुमारे १२ ते १३ हजार हेक्‍टवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे.

हवेतील आर्द्रतेवर येणारे पीक म्हणून दादरची ओळख आहे. त्याची पेरणी खानदेशात तापी काठावरील तालुक्‍यांमध्ये अधिकची असते. तसेच पाचोरा, भडगाव व चाळीसगाव भागातही पेरणी केली जाते. यंदा पारोळा पश्‍चिम व उत्तर, शिंदखेडा व अमळनेरातील पूर्व, दक्षिण भागात हंगाम बिकट आहे. भडगाव व चाळीसगावमधील धुळ्याकडील भागातही स्थिती बिकट आहे. विहिरींचे पाणी खोल गेल्याने गव्हाची पेरणी अपेक्षित होणार नाही. चोपडा, रावेर, यावल, शिंदखेडा, जळगाव व अमळनेरचा तापीकाठ, शहादा, तळोदा, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्‍यांमध्ये रब्बीची बऱ्यापैकी पेरणी होईल. अन्य कृत्रिम जलसाठ्याच्या भागातही पेरणी होईल. दादरची पेरणी चोपडा, जळगाव, शिंदखेडामधील तापीकाठ आदी भागात झाली आहे. काही ठिकाणी तर ज्वारीचे पीक तरारले आहे. हरभरा पेरणी या आठवड्यात काही भागात सुरू झाली आहे. शासकीय महामंडळाच्या हरभरा बियाण्याला शेतकऱ्यांची पसंती आहे.  चारा व धान्य देणारे पीक म्हणून यावल, जळगाव भागात काही शेतकऱ्यांनी मका लागवडही सुरू केली आहे.

मक्‍याची लागवड पुढे वाढेल. सध्या फारशी लागवड नाही. काही शेतकऱ्यांनी उडीद, मूग व आता सोयाबीनच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रात लागवड केली आहे. ज्वारीची सुमारे पाच ते सहा हजार हेक्‍टवर पेरणी आटोपल्याची माहिती आहे. मक्‍याची तीन ते साडेतीन हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचीदेखील सुमारे अडीच ते तीन हजार हेक्‍टवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT