Sow on 4.5 lakh hectares in Nagar district
Sow on 4.5 lakh hectares in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरा

टीम अॅग्रोवन

नगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. परिणामी, जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यात खरिपाचा पेरा सुरू झाला. आजअखेर जिल्ह्यात ४ लाख ५३ हजार ३९५ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १०१ टक्के पेरणी पूर्ण झाली. बहुतांश ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत.

नगर जिल्ह्यात मृगानेही जिल्ह्यात जोरदार बरसात केली. काही महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. खरिपासाठी महत्त्वाचे मानले जाणारे मृग नक्षत्र बरसल्याने उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कापूस, बाजरीच्या पेरणीसाठी तिफण फिरू लागली. त्यानंतर आर्द्रा नक्षत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळला. त्यामुळे जूनमध्येच खरिपाच्या पेरणीने वेग घेतला.

आजअखेर जिल्ह्यात ४ लाख ५३ हजार ३९५ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. कृषी विभागाच्या अंदाजानुसार ४ लाख ४७ हजार ९०० हेक्‍टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित होती. सरासरीच्या तुलनेत कृषी विभागाच्या अहवालानुसार, आत्तापर्यंत खरिपात१०१ टक्के पेरणी झाली. दरम्यान, खरिपाची पेरणी वेळेवर झाल्याने शिवारात समाधानाचे वातावरण आहे. कोळपणी, खुरपणी, डवरणीद्वारे आंतरमशागतीची कामे सुरू आहेत.

भरारी पथके नेमकं करतात काय खते, बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे १५ भरारी पथके नियुक्त केली आहेत. मात्र, जिल्ह्याच्या अनेक भागांत खते देण्यास शेतकऱ्यांना टाळाटाळ केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी पिळवणूक थांबली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा अॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिला आहे. खताबाबत शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल तर प्रशासनाने नियुक्त केलेले भरारी पथके नेमके काय करतात असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT