दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘व्यक्ती’च श्रेष्ठ
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘व्यक्ती’च श्रेष्ठ 
मुख्य बातम्या

दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘व्यक्ती’च श्रेष्ठ

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रातही राजकीय पक्षांपेक्षा व्यक्ती निष्ठेलाच महत्त्व येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत पक्ष केवळ नावालाच असतील प्रचार मात्र पक्षनिष्ठा बाजूला ठेवूनच होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहे.  कोल्हापूर मतदारसंघात काॅँग्रेस राष्ट्रवादी काॅँग्रेस आघाडीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी पक्की झाली आहे. राज्यात दोन्ही काॅँग्रेसची आघाडी असल्याने काॅँग्रेसच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी श्री. महाडिक यांचा प्रचार करणे अपेक्षित होते. परंतु, अंतर्गत कलहाचा फटका काॅँग्रेस आघाडीला बसणार आहे.  काॅँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवत शिवसेनेचे   उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा प्रचार करण्याचे जाहीर केल्याने आता आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार एकत्रित होणार तरी कसा असा सवाल आहे. काॅँग्रेसचा आमदार शिवसेनेच्या प्रचारात असे चित्र कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे. 

हातकणंगलेत हक्काच्या चिन्हाविना दोन्ही काॅँग्रेस स्वाभिमानीचा बालेकिल्ला असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेनेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने यांना मोठी ताकद उभी करावी लागणार आहे. शिवसेनेतील सर्व गटांना एकत्रित आणून ताकद दाखविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. आघाडीच्या खेळात दोन्ही काॅँग्रेसना येथे स्थान गमवावे लागले. अनेक ठिकाणी काॅँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्येही खासदार शेट्टी यांचा प्रचार करण्याची मानसिकता नाही. या ठिकाणी कारखानदार लॉबीकडेही लक्ष आहे.

सांगलीत गटबाजीला उधाण सांगलीची जागा स्वाभिमानीला मिळण्याची शक्‍यता असल्याने काॅँग्रेस पक्षात प्रचंड नाराजी आहे. काॅँग्रेसअंतर्गत दोन गटांतील वादामुळे ही उमेदवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याबाबत काॅँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यंचे एकमत झाल्याचे सध्याचे चित्र आहे. काॅँग्रेसने स्वत: रणांगणातून माघार घेतल्यास काॅँग्रेस आघाडीने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा काॅँग्रेसमधील घटकांनी घेतला आहे. काॅँग्रेस अन्याय करीत असल्याने आम्ही तो सहन करणार नाही, असे प्रमुख कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT