तळकोकणात मुसळधारेचा इशारा
तळकोकणात मुसळधारेचा इशारा 
मुख्य बातम्या

तळकोकणात मुसळधारेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे  : माॅन्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाल्याने तळ कोकणात आजपासून (ता. ५) मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. बुधवारपासून (ता.६) कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती, मॉन्सूनच्या वाटचालीस तयार झालेले हवामान, अरबी समुद्रावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा असल्याने किनारपट्टीलगत ढगांची दाटी झाली आहे. सोमवारी (ता. ४) सायंकाळी तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाला सुरवात झाली होती. उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात; तर शुक्रवारपासून (ता. ८) विदर्भात पाऊस जोर धरणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.    राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसाची धार सुरूच आहे. राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी; तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हेजरी लावली. कोकणातील रत्नागिरीच्या शिरगाव, मंडणगड, सिंधुदुर्गमधील मालवण, मध्य महाराष्ट्रातील साताऱ्याच्या माळवडी, सांगलीतील भाळवणी, ताकारी, वांगी, चिंचणी, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आंबड, बीडमधील धोंडराई, हिंगोलीतील डेहळेगाव, हट्टा यासह काही ठिकणी पावसाचा जोर अधिक होता. 

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस :

  • कोकण : रायगड-महाड ४०, तुडील ३५, कोंडवी ३३, वाकण ३७, रत्नागिरी- मार्ग ताम्हणे ३१, असुर्डे ४९, शिरगाव ६६, शिरशी ३७, अंबवली ५४, तळवली ३०, पाटपन्हाळे ३०, मंडणगड ६७, देव्हारे ३२, पाली ५५, फणसावणे ४८, म्हाबळे ३८, सिंधुदुर्ग - मालवण ६५, कणकवली ३५, फोंडा ३०, कडवळ ३३, माणगाव ९६, भेडशी ३२.
  • मध्य महाराष्ट्र : नगर-शेगाव ३०, सलाबतपूर ३०, सातारा- शेंदरे ३८, अंबवडे ४१, वडुथ ४८, कराड ३०, कुमथे ५०, शिरांबे ३८, खटाव ४६, पुसेगाव ४२, माळवडी ५९, म्हसवड ३५, लोणंद ३८, भुईंज ३५, सांगली - लेंगरे ३८, भाळवणी ५९, ताकारी ६१, पेठ ४०, खरसुंडी ३०, कुची ३५, हिंगणगाव ३३, कुंडल ४३, वांगी ६३, चिंचणी ६२, भोडसगाव ४३, कोल्हापूर - गगनबावडा ३२, अाजरा ३२.
  • मराठवाडा : औरंगाबाद- शेंदुरवाडा ३३, अांबड ५९, वातूर ४०, घनसांगवी ३२, बीड- धोंडराई ५७, लातूर-कासारबालकुंड - ३६, उस्मानाबाद-उमरगा ३५,  परभणी-सेलू ३६, हिंगोली-नर्सी ३३, येहळेगाव ५५, हट्टा ५९.विदर्भ : यवतमाळ-कोलंबी ३१, जांब ४१, गोंदिया-ठाणा ४३, चंद्रपूर- बेंबळ- ३३, सिंदवाही ३६, विहाड ४५, पाटण ३०, गडचिरोली अहेरी ४०. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT