sugar export
sugar export  
मुख्य बातम्या

निर्यात साखर अनुदानाचे एक हजार कोटी देणार

टीम अॅग्रोवन

मुंबई: केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना निर्यात वाढविण्यासाठी २०१८-१९ मध्ये निर्यात अनुदान जाहीर केले होते. साखर निर्यात अनुदानाचे प्रलंबित एक हजार कोटी दोन आठवड्यांत देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.    देशात २०१८-१९ या गाळप हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर बाजारात साखरेचा आतिरिक्त पुरवठा झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारने कारखान्यांना साखर निर्यात करण्यास सांगितले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर दबावात असल्यामुळे कारखान्यांना निर्यात करणे आतबट्याचे झाले होते. त्यामुळे साखर कारखान्यांनी निर्यात वाढवावी, यासाठी केंद्र सरकारने अनुदान योजना जाहीर केली. या योजनेनुसार साडेचार हजार कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करून ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दीष्ट दिले. सरकारने मागील हंगामात जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम कारखान्यांना मिळाली नाही. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांची स्थिती बिकट झाली. परिणामी अनेक कारखान्यांनी यंदाच्या हंगामात साखर निर्यातीची गती धीमी केली आहे.  निर्यातीसाठी प्रतिकिलो १०.४५ रुपये अनुदान चालू साखर हंगामात केंद्र सरकार ६० लाख टन साखर निर्यातीसाठी साखर कारखान्यांना ६ हजार ७२० कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. त्यानुसार साखर निर्यातीसाठी प्रतिकिलो १०.४५ रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे गेल्या हंगामातील अतिरिक्त साठा असलेल्या साखर कारन्यांना निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. ३८ लाख टन साखर निर्यात  गेल्या हंगामात कारखान्यांनी ३८ लाख टन साखर निर्यात केली. यानुसार कारखान्यांना २ हजार ९०० ते तीन हजार कोटी अनुदान मिळणे अपेक्षित होते. यापैकी एक हजार कोटी रुपये केंद्र सरकारने यापूर्वीच दिले आहेत. तर एक हजार कोटी लवकरच देणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT