सोलापुरात भीजपाऊस, खरीप पिकांना दिलासा
सोलापुरात भीजपाऊस, खरीप पिकांना दिलासा 
मुख्य बातम्या

सोलापुरात भीजपाऊस, खरीप पिकांना दिलासा

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाने गुरुवारी (ता. १६) अखेर दमदार पुनरागमन केले. बुधवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील अनेक भागांत भीजपाऊस चांगलाच व्यापला होता. गुरुवारी पहाटे मात्र त्याचा जोर चांगलाच वाढला. दरम्यान, या पावसाने खरिपातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा जूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यावरच खरिपाच्या पेरण्या उरकल्या. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ७९ हजार हेक्टर निश्चित असताना, यंदा दुप्पट क्षेत्रावर पेरण्या झाल्या. त्यानंतर किरकोळ हजेरी वगळता पावसाने जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ पाठ फिरवली आणि खरीप हंगाम धोक्यात आला. गेल्या पंधरवड्यापासून पावसाअभावी पिके माना टाकू लागले होते. पण या पावसाने या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मूग, उडीद आता अंतिम टप्प्यात आहे. पण सोयाबीन, तुरीला याचा चांगला फायदा होणार आहे.

जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, मोहोळ मंगळवेढा, दक्षिण सोलापूरसह उत्तर सोलापूर तालुक्यांतील काही गावांमध्ये बुधवारी दुपारपासून रिमझिम पाऊस सुरू झाला होता. सायंकाळी त्यात थोडासा वेग वाढला. पण गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच पावसाअभावी रखडलेली कांदा लागवडही आता वेग घेणार आहे.

‘उजनी’ही ५० टक्क्यांच्या दिशेने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात. तसेच पुणे जिल्ह्यातही पाऊस सुरू झाल्याने उजनीकडे येणारा विसर्ग वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील काही धरणांमधून अतिरिक्त पाणी पुढे सोडण्यात येत आहे. दुपारी मिळालेल्या माहितीनुसार उजनीत ४१.७५ टक्क्यांवर पोचला आहे. पाण्याची पातळी ४९३.८४० मीटर झाली आहे. एकूण पाणीसाठा २४३६.३० दलघमी इतका झाला आहे. त्यापैकी ६३९.४९ दलघमी इतका उपयुक्त साठा आहे. दौंडकडून २० हजार २३१ क्युसेक विसर्ग सुरू होता. हा विसर्ग असाच प्रवाहित राहिला, तर येत्या चार दिवसांत धरणाचा साठा ५० टक्क्यांवर पोचण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT