सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींसह तीन सरपंचांसाठी २४ मार्चला निवडणूक
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींसह तीन सरपंचांसाठी २४ मार्चला निवडणूक 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची २४ला निवडणूक

टीम अॅग्रोवन

सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायती व तीन सरपंचपदांसाठी रविवारी (ता. २४) निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदानावेळी मतदारांच्या डाव्या बोटाऐवजी उजव्या बोटास शाई लावावी, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणूक अधिकाऱ्यास तशा सूचना दिल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. त्याच धामधुमीत आता गाव स्तरावरील या आठ गावांतही प्रचाराचा जोर सुरू आहे. पक्षीय पातळीपेक्षा गाव स्तरावरील गटातटातच या गावात निवडणुका रंगल्या आहेत. त्यामुळे ऐन दुष्काळातही प्रचाराचा तोफा चांगल्याच कडाडत आहेत. या निवडणुकासाठी प्रशासनानेही योग्य ते नियोजन केले. 

बार्शी तालुक्‍यातील ताडसौंदणे, माढा तालुक्‍यातील वेणेगाव व उजनी टें., पंढरपूर तालुक्‍यातील लोणारवाडी, अक्कलकोट तालुक्‍यातील कल्लपावाडी, सातन दुधनी व संगोगी ब, तर मंगळवेढ्यातील शिवणगीचा समावेश आहे. याशिवाय अक्कलकोट तालुक्‍यातील दहिटणे, दक्षिण सोलापुरातील  मंद्रूप, मंगळवेढ्यातील नंदूर ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीही मतदान होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT