In Solapur district, crop loan disbursement is only 15 percent
In Solapur district, crop loan disbursement is only 15 percent 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप अवघ्या १५ टक्क्यांवर

टीम अॅग्रोवन

सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक कर्जवाटपासाठी अग्रणी बँकेने १४३८ कोटी ५२ लाख रुपयांचा पतआराखडा तयार केला आहे. पण, त्यापैकी आतापर्यंत फक्त २२१ कोटी ५३ लाख ३७ हजार (१५.४० टक्के) रुपये एवढेच वाटप झाले आहे. बँकांकडून सांगितली जाणारी कागदपत्रांची जंत्री आणि विविध कारणांचा पाढा, ही कर्जवाटप रखडण्याची प्रमुख कारणे आहेत. 

दरवर्षी जिल्ह्याचा पतआराखडा आखला जातो. जिल्हाधिकारी स्वतः त्यावर नियंत्रण करतात. पण, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तिकडेच अधिक व्यस्त आहेत. त्यामुळे पीककर्जाच्या विषयाकडे त्यांनी अद्याप लक्ष दिले नसल्याचे दिसते. परिणामी, बँका अधिक बेफिकीरीने वागत असल्याचे चित्र आहे. 

नव्या कर्ज वाटपाबाबत बँका अगदीच उदासीन असल्याचे दिसते. सात-बारा उतारा, आठ अ, पीकनोंदणी दाखला, ग्रामसेवक, तलाठ्यांचा येणेबाकी नसल्याचा दाखला, यासारखी ढिगभर कागदपत्रे सांगितली जात आहेत. पुन्हा ती मिळवण्यासाठी तलाठी, ग्रामसेवकाच्या पाठीमागे लागावे लागते. तेही जागेवर भेटत नाहीत, या हेलपाट्यानेच शेतकरी हैराण होऊन पुन्हा बँकांकडे जाण्याचे टाळत आहेत. 

कर्जमाफीधारक शेतकरी वाऱ्यावर 

जुन्या कर्जदारांनाही काही बँका नव्याने पुन्हा सर्व कागदपत्रे मागत आहेत. तसेच कर्जमाफी झालेल्या आणि पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांनाही बँका वरुन अद्याप आदेश आले नाहीत, असे सांगत आहेत. अशा प्रकारे विविध कारणांचा पाढा वाचला जात आहे. त्यातही राष्ट्रीयकृत बँका आघाडीवर असून, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज न देता बॅंकांनी वाऱ्यावर सोडले आहे.  असा आराखडा, असे वाटप 

  • २९ बँकांच्या ५३५ शाखांद्वारे कर्जवाटप 
  • खरिपासाठी १४३८ कोटी ५२ लाख रुपयांचा आराखडा 
  • १०५९ कोटी ६९ लाख रुपये राष्ट्रीयकृत बँकांचे उद्दिष्ट 
  • जिल्हा बँकेला १५४ कोटी ५७ लाखांचे उद्दिष्ट 
  • आतापर्यंत फक्त २२१ कोटी ५३ लाखांचे वाटप 
  • बँकांची प्रमुख कारणे 

  • पुनर्गठण आणि कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना नव्याने कर्ज देण्याबाबत परिपत्रक नाही. 
  • एकत्र कुटुंब असेल आणि खाती अनेक असतील, तर तुमचे खाते निरंक नाही, कर्ज देण्यात अडचण आहे. 
  • जुन्या कर्जदारांनी नव्या कर्जासाठी पुन्हा नव्याने सर्व कागदपत्रे द्यावीत. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT